Saturday, December 25, 2010

तिच्या येण्याचा होता भास
हातातच राहतो त्याच्या घास
तो किती दाखवतो प्रेम खोटे
ती म्हणते बर आता पुरे , बास्स.
त्याला वाटते तिने समजून घ्यावे
ती कळतच नाही कस अडजस्ट व्हाव.
तो गंभीर गंभीर गुंतून नसत्या प्रश्नात
ती म्हणते कधीतरी त्याने मनमोकळ हसावं
ती अशी अपेक्षा करते त्याच्या खुलण्याची
तो दिसू दे गंभीर परि त्यास काळजी तिची
तो राहून असा उदास चिंतीत परी तिची काळजी
ती दुखी कष्टी पाहून अशी मुद्रा होईल कशी आनंदी ?
तो प्रयत्नात सतत तीला खुष राखण्याच्या
ती ही असते त्याच्याच हस्यामुखाची छंदी
तो राखून शब्द ठेवी ओठात काही तिच्या साठी
ती चोरते हळुवार नजरेतूनच पाहून संधी
तो भासे तीला मदनाचा पुतळा
ती असे त्याच्या हृदयाच्या स्पंदनी !!
तो विचारी कसे मिळवलेस प्रेम सखे
ती म्हणाली फक्त स्वतःस केले तुला समर्पित मी

No comments:

Post a Comment