Saturday, December 25, 2010

ती अशी बहरून आलेली वेल त्याच्या संगतीत,
तो असा दरवळून आलेला चाफा तिच्या प्रीतीत.

ती अशी प्रभात वेळी कोकिळेची मधुर ताण
तो असा तिच्या मनातल्या आनंदाचे उधाण

ती अशी त्याच्या गोड अधीर स्पर्शाची हुरहूर,
तो असा तिच्या अंगी फुलणारा गुलाबी रोमांच.

ती अशी त्याच्या गीतातली एक नाजुकशी जागा
तो असा तिच्या स्पंदनांचा स्वर सरळ साधा

ती अशी नकळत ही त्याच्या विचारत गुंतलेली
तो असा की क्षण न क्षण तिच्याशी बांधलेला

त्ती अशी डोळस जगात.. आंधळी प्रीत वेडी
तो असा प्रकाश तिच्या अंतर्मनातून निघालेला

तो सुगंध देत राही मनामनात सदैव तिच्या दरवळून जाई ,
ती अशी दिसे तयाला ताजेतवाने सुकुमार सुमन क्षणाक्षणाला

तो असा जणू संभ्रम गोंधळ प्रश्न कोड बनून राही
ती अशी कधी स्पष्ट कधी धूसर .. कुणाला कळलीच नाही

तो असा जणू संभ्रम गोंधळ प्रश्न कोड बनून राही
ती अशी कधी स्पष्ट कधी धूसर .. कुणाला कळलीच नाही

तो असा सरत्या वाटेवर दूरवर दिसणारा एक निवारा
ती अशी रणरणत्या उन्हातला शुभ्र धबधबा कोसळनारा
तो असा क्षणो क्षणी आठवणीत तिच्या मोहरणारा,
ती अशी हृदय तिचे त्याच्या प्रेमाचा गाभा.

तो असा तिच्या रुक्ष रुक्ष जीवनाचा ओलावा
ती अशी भाव त्याच्या कंठात दाटून आलेला

तो असा तिच्या मनः प्रांगणी बरसणारा प्राजक्त,
ती अशी स्पर्शिता त्याने गाल होती आरक्त.

तो असा विवंचित पाहुनी तिची विवंचना
ती अशी त्याच्यासाठी फक्त तिची कुचम्बना


तो असा सतत तीच्या आठवणीत रमणारा
ती अशी त्याला मानुन जगे जीवन सहारा

तो असा कधी संभ्रम तिच्या शंकित मनीचा
ती अशी कधी मृगजळ कधी भ्रम त्याच्या लेखणीचा

तो असा जणू तिच्या हळुवार हृदयीची आर्तता,
ती अशी जणू त्याच्या अधू-या जीवनाची सार्थकता

तो असा निष्पाप निरागस त्याचे बोल
ती अशी जाणून त्याच्या शब्दाचे मोल

ती विश्वात रमते त्याच्याच जरी शर अंतरी असे,
तो असो बाण खोल,तरी सल त्याचा भासे अनमोल

ती चंदनासम सुगंधी , चांदण्या सम शीतल अनुपम
तो अनमोल परीस स्पर्श , पहाटेचा पाहिलं तेज नभ

ती अशी वेडी होई बेभान सर त्याच्यासाठी,
तो असा एक संभ्रम फक्त आभास तिच्यासाठी.

ती अशी पहिले न विश्व तिचे तिने त्याच्याविना
तो असा कल्पिले न जग त्याचे त्याने तिच्याविना
ती दिशा त्याच्या जीवनाची सोडी न त्याचा हात
तो आनंदाने चालत राही मस्त मस्त झोकात ..

ती प्रारब्ध होऊन निमित्त होई त्याच्या जीवनात
तो अरुणोदय सुंदर नितांत तिच्या आयुष्यात

ती प्रारब्ध होऊन निमित्त होई त्याच्या जीवनात
तो अरुणोदय सुंदर नितांत तिच्या आयुष्यात

ती दिशाहीन होता चाचपडून शोधे आधार त्याचा
तो नेहमीच तिच्या जवळ दिशादर्शक तिचा

ती असे प्रेरणा तयाची ,नवकल्पना निरागस
तो असे विश्वास तीचा , अचल निरंतर

ती स्वप्नगंध भावरंग त्याच्यात ती दंग
तो वेचतो तिची शब्दफुले अजोड ते बंध

ती सोबत त्याच्या हसते मनमुराद,
तो असा तिच्यासवे जगतो दिलखुलास.

ती जशी कंपने त्याच्या थरथरत्या ओठांची
तो असा स्पंदने तिच्या ओघवत्या अश्रूंची


ती अशी गोड हूरहूर त्याच्या काळजाची,
तो असा नादमयी लय तिच्या स्पंदनांची.

ती अशी ओघवती गझल त्याच्या शब्दात
तो असा आर्त आलाप तिच्या प्रारब्धात

ती अशी तो येता होतसे वसंतातला बहर,
तो असा ती येता येतसे जाणीवांना मोहोर.

ती अशी दूर तो जाता मौन वणवा विरहाचा
तो असा दूर ती जाता केवील स्वर विराणीचा
ती होई उतावीळ आपल त्याला करण्याला
तो मागे साथ तिची तृप्त दोन्ही मने करण्याला

ती अशी गुंफून प्रीत सुमने सजवी ते बंधन
तो असा बांधी रोज तिजसाठी एक स्वप्न सदन

तो स्वप्नात तिला घाली मिठीचे गुंफण ,
ती झुगारून देई जगाच्या विरोधाचे बंधन...

तो सर्वस्व तिचे होताना जपतो तिचे अस्तित्व
ती विसरून तिचे अस्तिव जपते त्याचे सर्वस्व

तो असा भ्रमला सुचेना तिच्याविण काहीही तयाला
ती मनात लपुनी त्याच्या पहात राही सर्व आपदा

तो असा शांत आज, खात्री तिच्या प्रेमाची त्याला
ती अशी वेल्हाळ त्याची शांतता छळते तिला

तो असा प्रेमळ जीव तिच्यावर ओवाळी,
ती अशी मधुरा जणू हसरी पहाट.

तो लावी एक एक ज्योत तिच्या हृदयी अंगणी
ती होते कधी सांजवात कधी त्याची प्रभात

ती न्हाऊन घेई ,चिंब होऊन जाई त्या वर्षावात
तो आनंदाने बघत राही तिला आपल्या अंतरात

तो बहर तिच्या मनाचा फुलतो सांज सकाळ
ती सांजवात कधी प्रभात दिशा त्यास अंधारात
तो झेलतो एक एक वार तीच्या नयनांचा,
ती लाजतच बनवते त्याला निशाणा
तो गुज कधी सांगे तिला त्याच्या मनीचे
ती मात्र होई कोडे सहजी त्याला सुटेना

तो आसुसलेला तीच्या भेटीसाठी,
तीचीही तहान भेटीची काही मिटेना
तो घाली साद करी हृदय मूक आक्रोश जरी
ती होई अलिप्त बधीर काही तिला कळेना

तो अथक करी यत्न तीला मनवण्याचा,
ती नाटकी, जाणून सारे काही वळेना
तो असा बेफाम होई कोसळता पाऊस जसा
ती मुग्ध सखी घेई लटक्या रागाचा आडोसा

ती मनापासून इच्छूक चिंब पावसात व्हावया
तोही जाणी कशाची आहे मनी तिच्या पिपासा

तो इंद्रधनू शब्द हृदयआभाळी कोरी प्रेमाचा
ती जाणून होईल अदृश्य ,भास फक्त नजरेचा
तो म्हणे मज न कळे हे कसले बोल
ती म्हणे तुझ्याशिवाय न आयुष्याला काही मोल
तो असा, कधी तसा ,तर कधी असा
ती अशी वाघोबा, प्रेमात तो भित्रा ससा

तो घालतो झडप तीच्यावरी टा़कूनी उसासा,
ती टाळते त्याचा स्पर्श हवाहवासा
तो होई अवखळ श्रावणात रंग प्रेमाचा
ती दूर नजरेतूनच देई प्रेमाचा भरवसा


तो होत असे व्याकूळ प्रेमाचा दिवाना
ती डोळ्यातील मारे नयनतीर हवा हवासा
तो आज मित्रांच्या गराड्यात गुंग जरासा
ती अशी शोधी त्याच्या प्रेमाचा कवडसा

ती भिजू पाहे चिंब, मन टाकी तिचे वसा
तो जपत राही स्वच्छ ठेवी ह्रदय आरसा .
तो असा जपतो ओल्या मनात दवबिन्दुसम तिला
ती अशी ओघळू पाहे एकरूप स्पंदनात होण्या

तो एकरुप तीच्या स्पंदनात श्वास होऊनी,
ती आतुर त्याच्या नजरेतून प्रेम तीचे पहाण्या
तो असा अधीर ठाव घेई तिच्या स्पंदनांचा
ती अशी घाव देई अबोल्याचा त्याला जीवघेणा
तिच्या येण्याचा होता भास
हातातच राहतो त्याच्या घास
तो किती दाखवतो प्रेम खोटे
ती म्हणते बर आता पुरे , बास्स.
त्याला वाटते तिने समजून घ्यावे
ती कळतच नाही कस अडजस्ट व्हाव.
तो गंभीर गंभीर गुंतून नसत्या प्रश्नात
ती म्हणते कधीतरी त्याने मनमोकळ हसावं
ती अशी अपेक्षा करते त्याच्या खुलण्याची
तो दिसू दे गंभीर परि त्यास काळजी तिची
तो राहून असा उदास चिंतीत परी तिची काळजी
ती दुखी कष्टी पाहून अशी मुद्रा होईल कशी आनंदी ?
तो प्रयत्नात सतत तीला खुष राखण्याच्या
ती ही असते त्याच्याच हस्यामुखाची छंदी
तो राखून शब्द ठेवी ओठात काही तिच्या साठी
ती चोरते हळुवार नजरेतूनच पाहून संधी
तो भासे तीला मदनाचा पुतळा
ती असे त्याच्या हृदयाच्या स्पंदनी !!
तो विचारी कसे मिळवलेस प्रेम सखे
ती म्हणाली फक्त स्वतःस केले तुला समर्पित मी
ती मधुमती होऊ पाहे धुंद

तो भ्रमर चाखू पाहे प्रेमाची अवीट गोडी

ती त्रासून अगतिक, डोळ्यात येई पाणी

तो जाणून तिचे मन हसून तिज सोडी

ती, नक्षत्ररुपी, राणी अप्सरांची

तो, संमोहीत तीच्यात देवेंद्र

ती दिव्य एक ज्योत प्रकाशमान

तो मंत्र मुग्ध बघून तो मुखचंद्र

तो नाहीच राहू शकत तिच्याविना,जाणते चतुरस्र

ती झुलवीत राही ,तियेचे नयन हेच दुधारी अस्त्र

तो जाणून हि अजाण , राही अबोध अज्ञान

ती समजावून थकली न कळे त्याला तोच तिचा प्राण
ती अशी समर्पित झाली पूर्ण जेव्हा ,

त्याला ऐकू आला सूक्ष्म नाद तेव्हा .

ती अशी हरून केवील प्रेमात आता

तो जाहला अंतर्नाद तिच्या मनातला

तो असा अविनाशी,तरी पडला मोहात

ती मेधावी लाघवी,पाडले तया मोहात ...

तो असा जल तरण पटटू पट्टीचा तरी

बुडून गेला तिच्या डोळ्यांच्या खोल डोहात

तो असा सौंदर्याचा अभिजात पुजारी,

ती सुंदर, जणू अप्सरा इंद्रदरबारी

तो असा आभाळ तिच्या डोळ्यातले अथांग

ती अशी त्याच्या मनातली उंच भरारी

ती ना दाखवीता ही काळजीत

तो हस-या चेहऱ्यामागुन तीच्या चिंतेत

ती आज पहाट उमललेली किरणान्सवेत
तो पहाटवारा अगतिक वाहतो तिच्या नशेत
ती अशी की त्याची वाट पहात थांबलेली

तो असा तिच्या स्वप्नांमध्येच रमलेला

ती अशी पाण्यावर चित्रे रेखाटणारी

तो असा तरंग होऊन तिला छळणारा


ती अशी त्याच्यासाठी कोड न सुटणारी

तो असा तिच्यासाठी कोडयातच राहणारा

ती अशी शब्दांमध्ये अडकून पडणारी

तो अलगद तिची कविता होऊन जाणारा

ती अशी अबोल बोल कवितांची

तो असा शब्द तिच्या मनातला

ती अशी ओळ ओळ रचनेतली

तो असा गर्भित अर्थ त्या ओळींचा

ती अशी अर्थ अर्थ प्रेमाचा

तो असा छंद तिच्या जीवनाचा

ती अशी मुक्त उधळण फुलांची

तो असा बंदिस्त रंग त्यांचा

ती अशी मधुराणी फुलांची

तो असा मकरंद गंधाचा

ती अशी कोमल जाई जशी

तो हळुवार स्पर्श गारव्याचा

ती अशी लाजवंती पानातली

तो असा घनश्याम थेंबातला

ती अशी हुरहूर मनातली

तो असा नाद स्पंदनातला

तो आळविता हृदयातल्या देवतेला

ती अशी, कांकणांचा झंकार केला

तो दूर दूर आता नाही परतणार पुन्हा

तिचा आर्त सूर कंकण नादात विरून गेला
तो असा वेडा खुळा बावळा
ती अशी करोडोंच्या दुनियेत एकमेव त्याचा सहारा !!

तो असा आशेच्या दुनियेत निराश जरासा
ती अशी त्याच्या जिंकण्याचा भरवसा

तो असा मनमोहन श्याम मुरारी,
ती अशी जणू त्याची राधा बावरी.

तो असा कधी बैरागी सांब भोळा
ती अशी व्रतस्थ त्याची पार्वती

तो असा झुरतो तिच्या एका हास्यासाठी,
ती अशी नेहमीच हसते त्याच्या सुखासाठी.

तो असा जाणून ती तिची वेदना हास्यातली
ती अशी जपते मुकी आसवे त्याच्या डोळ्यातली

ती जपते आसवे, मुकी वाटली तिला जरी
तो असा, बोल तयातले ऐकतो क्षणोक्षणी ...

ती अशी अबोल होऊन बोलते मौनातुनी
तो असा गुंफिते मौन तिचे शब्दातुनी

ती जपते आसवे, मुकी वाटली तिला जरी
तो असा, बोल तयातले ऐकतो क्षणोक्षणी ...

ती अशी अबोल होऊन बोलते मौनातुनी
तो असा गुंफितो मौन तिचे शब्दातुनी

तो असा जाणतो बोल डोळ्यातुनी
ती साद घालते श्यामल नेत्रातूनी ...

तो शोधतो तिच्या डोळ्यात त्याला
ती सांगते काय पापण्या झुकवूनी

तो शोधतो तिच्या डोळ्यात त्याला
ती सांगते काय पापण्या झुकवूनी

ती अशी बंद करी पापण्यात त्याला,
तो असा वेडापिसा शोधतो स्वतःला..
ती अशी समईची मंद मंद तेवणारी वात,

तो असा जणू बेभान पिसाट वारा.

ती अशी होते त्याची संध्या सांजरंग

तो होतो तिच्या शब्दांचा किनारा

ती अशी लाटांवर तरंगणारी,

तो असा कायम तिला जपणारा ...

ती अशी त्याच्या गुणांवर भाळलेली

तो असा तिच्या मनात विरघळलेला

ती अशी जणू चांदणी चमचमली

तो चंद्र जसा जवळ घुटमळलेला...

तो दूर जाता नजरा सख्यांच्या त्याच्या पाठी

ती अशी मग चीतागती मनी मळभ दाटलेला

ती मनोमनी उचंबळून येते अशांत सागरापरी

तो सागर निवांत नागफण्यावरी विसावलेला

ती अशी रुद्र कधी करी तांडव अश्रुंचे त्यासाठी

तो हि वाट पाही ,शांत होता ज्वालामुखी पिऊन घेई
तो असा धुंद बेभान बरसता पाऊस,
प्रेमात तिला चिंब करण्याची त्याला हौस.

ती अशी विरहाची आग प्यालेली रागिणी
तिचे जळणे, तरफडणे, त्यास वाटे मौज

ती अशी विरहाची आग प्यालेली रागिणी
तिचे जळणे, तरफडणे, त्यास वाटे मौज "

तो असा स्वतःत किती दंग कशात मग्न ?
भावनिक छंद , सगळेच नियम त्यापुढे गौण

ती अशी जणू फुलांचा बहर,
तो असा जणू गंधवेडा भ्रमर.

ती अशी माळून केसात मोगरा
तिचे सौंदर्य त्याच्या साठी कहर

तो असा घायाळ तिच्या नजरेने,
ती अशी व्याकूळ त्याच्या सहवासाने.

तो असा चारचौघात दूर तिच्या पासून
ती जवळ येता होतो धुंद तिच्या श्वासाने

ती अशी जणू प्रेमवेडी राधा,
तो असा तिचा सखा हरी सावळा.

ती अशी सोज्वळ जपते जन रीत
तो प्रेमवेडा ,त्याचा जगावेगळा प्रेम सोहळा
तो असा चतुर कि जाणतो सर्व तिचे
मौनात जरी ती , डोळे बोलतात तिचे
ती अशी बंद करून डोळे मग मनाशी बोलते
स्वतःचंच मन पुन्हा पुन्हा चाचपते
तो असा बसलेला कायम मनात तिच्या
तिने चाचपताच हाताशी लागतो तिच्या
ती अशी मग होते बेधुंद त्याच्या स्वप्नी
असो कि नसो बघते स्वताला त्याच्या मनी

ती असते सतत श्वासात त्याच्या
तो असतो कायम ध्यासात तिच्या
ती श्वास श्वास दूर जाते टाकून निश्वास
तो असा आभास दूर जवळ वेडी आस

ती पास पास येऊन बनते अनामिक प्यास
तो ही मनी बाळगतो तीचा मधुर सहवास
ती अशी गंधित गंधित आठवणीत आज
जसा लेऊन निशिगंध तो नूतन साज

तो असा जणू माझ्या हृदयीचा राजा,
रोज करतो माझ्या स्वप्नात ये जा.

ती अशी त्याच्या हृदयाची एकमेव राणी
विरह तिचा हीच त्याच्या प्रेमाची सजा

तो असा सदा तिच्या आठवणीत दंग,
जपून जसा ठेवतो पहिल्या पावसाचा मृद्गंध !!

ती हि अशी होते मृदुगंध लेऊन त्याचा रंग
मोगर्या समान शुभ्र ती जपते एक सावळा संग

To My dear Friend Aadesh & Karuna .. spandan

ts very hard to believe

its very hard to see spandan

-------------- without you


the beautiful spandan ...

the wonderful spandan

............... waiting for you


I dont know what to do

but for the spandan ..

which make my words fly

which give me a lot .. which cant be destroyed

Dear friends for that

.................... thank you

only And only Spandan

whenever I want to speak
and don't find any word

whenever I feel alone
and there is no one for me in whole world

whenever I want to be happy more n more
while someone make me hurt

whenever I want discover myself
and wants to take a step forward

whenever I want to read that things
which I never read ,, and not already heard

whenever I want to read that things
which I had not read before and never heard

whenever I want to feel .. the beauty of life
spandan ,... its the only one .. beautiful world

only for lovely Spandan

what is the reason
you blossom in my heart
now in every season


what is the reason
there is no lock for the door
i like to be live in prison


what is the reason
some time its like a life
some time its become a poision


what is the reason
its becoming myself for me
its becoming like my hearts "spandan "...!!!

फक्त स्पंदन या समुहा साठी ...

Attribute to Spandan ...!!!
doesnt matter for it
what is the coulur?
doesnt matter for it
what is the look ?
doent matter for it
who is the person

it's a relation of soul
it is the only one ........ spandan !!

its the way, has no end
its the words , which tears has said
its the smile , which comes to spread

the happiness once again
none other than ......... spandan !!!

which cant be decided
which cant be planned
the music of life
the beat of hearts
it just happens .............. spandan !!!

more beautiful than vision
more beautiful than I have spoken
more fantastic than I experience
everything is so pure
holyness of it is so rare

blossoms in heart always
tat is the only gain ................ spandan !!!

its the breathe of art
its the song of passion
its the way to laugh
its the way to live
how can I leave ?

its with me always
I will come back again ...... spandan
तो असा तिच्या प्रेमात वेडा होणारा
क्षण क्षणाला तिच्यासाठी झुरणारा
ती अशी वेड्या प्रेमात शहाणपण जस
त्याच अवखळ हसन तिच्या नजरेत दिस
तो जणू नजरेतील निरागसता
तिच्या हृदयातील कोमलता
ती अशी निशिगंध समान दरवळत रहावी
तिच्या एकेक चारोळीची मी वाट पहावी


तो जणू माझ्या अंतरीचे गोड गीत
स्पंदनाना माझ्या त्याने झेडावे लयीत
ती अशी पाहून त्यांची प्रीत आनंदी
शंका नसावी फुलावीत तुमची स्वप्न स्वच्छंदी

तो तीच कि ती त्याची प्रश्न न यावा मनी
बाग स्वप्नांची फुलावी फुलाफुलानी
ती अशी पण प्रत्येक फुलाकडे पाहून
गहिवरते जोपासते देऊन डोळ्यातलं पाणी

तो असा जपतो, पडो न भूवरी मोती फुलावरुनी,
आनंदतो मनोमनी दंव तिच्या नेत्रातले पाहुनी ....
ती अशी मग रुसते आनंद त्याचा पाहुनी
म्हणते " तुला माझ्या वेदना कळणार नाही

तो असा जीवसखा तिच्या वेदना त्याच्याच ना !
त्यास होती ज्या ज्या संवेदना ,त्या तिच्याच ना !
ती पण का अशी शंकित मनी
मौन तिचे बोलते तू माझाच ना?
तो जणू ओंजळ दोन करांची
काळ्जाच कोंदण करून तिला जपणारा
ती अशी ओंजळीतून गळून पडणारी
थेंब थेंब तिला तो वेचू पाहणारा

तो असा निर्मल निरागस
तिच्या हसण्यातून दिसणारा
ती अशी झुळूक गारव्याची होते
त्याच्या तप्त अश्रूंचा किनारा

तो जणू पावसाचा शिडकावा
तिच्या वेदना शांत शांत करणारा
ती जणू स्थिर पाण्यात तरंग
हलक्या फुंकरेने लाटेसम उसळणारा

तो माझ्या हृदयाची अनामिक हुरहूर
जवळ नसता उरी खोल खोल दाटनारा
ती अशी अबोल अबोध तो जवळ येता
न बोलताच तो तिला कवेत घेणारा

तो असा जणू मुग्ध लोभस चाफा
जीवाला तिच्या सदा सुखावणारा
ती अशी मनोहारी सुंदर क्षितीज
तिच्यासाठी तो मनात दिनरात झुरणारा

तो असा तारकांच्या गर्दीतला चंद्र
तरी सतत रोहीनिसाठी तेजाळनारा
ती अशी प्रेमिका तुटणाऱ्या ताऱ्या समान
त्याच्या प्रेमाच फलित तिच्या तुटण्याचा मान

तो पहाटे क्षितिजावर तेजाल्णारा शुक्रतारा
स्वप्नात रमलेल्या तिला पाहून मुग्ध हसणारा
ती अशी गोड गोड स्वप्नात विखुरलेली
तो असा तिच्या स्वप्नातील क्षणांना आवरणारा
पाषाण शांत राही पायास ठेचताना
मातीच लाल झाली ते रक्त झेलताना

झेलून शांत मारा पाणी जलाशयाचे
हास्यतरंग देई घावास पेलताना

लाचार तो पक्षी का आकाश पंख आले
लाचार पिंजराही मोहात खेचताना

ऐकून साद तूझी बेभान आज व्हावे
राधा जशी भुलावी कान्हास भेटताना

आरास मांडलेली दीपावली दिव्यांची
अंधारली ति ही का प्रकाश फेकताना
थांब थोडे रात्र ती येईल पुन्हा
वेड चंद्राचे सख्या देईल पुन्हा

आजही तीने भुलावे चांदण्यांना
तीच चंद्र्भूल तो होईल पुन्हा

चिंब ओल्या श्रावणाचे गीत ओठी
सावळा तो मेघ ही देईल पुन्हा

पावलांच्या त्या खुणा खूणावती का
त्याच वाटेहून तो नेईल पुन्हा

लाजरी ती सांजसंध्या मोहरावी
क्षितिजाचे रंग ती होईल पुन्हा

मी न माझी तो न त्याचा प्रीतरंगी
रंग माझे तोच तो होईल पुन्हा
झाले तुझी कशी तूला कसे कळावे ?
ओशाळल्या कळीने त्या कसे फुलावे ?

धुंदीत आज तीचे श्वास गंध ओले
त्या पारिजातकाने ना कसे भुलावे ?

माझ्यात का तुझे रे प्राण गुंतलेले ?
स्पंदीत भाव आता हे कसे खुलावे ?

हिंदोळ आठवांचे उंच उंच गेले
आकाश ओंजळीने रे जसे झुलावे

आकांत हा मनाचा मी लपून होते
आभाळ होउनी तू का असे छळावे ?
येशील का तु घेऊनी नवे तराणे
गाशील का तु श्वासांना पुन्हा नव्याने

गेले मी दूर स्वप्नांच्या पल्याड माझ्या
रात्रीस भास तुझे ते नको पुराने

आकाश चांदण्यांचे दूर ते एव्हाना
डोळ्यात तारकांना शोधले मनाने

रेखीव वेदनांचे गीत कोरताना
गंधीत आसवे व्हावी तुझ्या सुराने

पारायणे मी केली तुझ्या आठवांची
अंधारले विश्व माझे क्षणा क्षणाने
डोळ्या तून काढावीत
झाडून सारी स्वप्ने आता
टाकाव्यात पुसून त्या
तुझ्या मनातल्या पाउल खुणा

खडसाव मनाला अन सांगाव
प्रेम केलंस हाच तुझा गुन्हा

अहंकाराच्या हास्यामागे कोंडलेल्या
मुक्त कराव त्या अश्रुना
एकदाच एकदाच वाहून द्याव
सगळ्याच त्या वेदनांना

खडसाव मनाला अन सांगाव
प्रेम केलंस हाच तुझा गुन्हा

भोळ्या भाबड्या मनाचा
अजून एका बळी गेला
निरागस हसऱ्या लेखणीला
आसवांची भेट देऊन गेला
झर झर झराव लेखणीनेही
अन शब्द शब्द ओथंबून यावा

खडसाव मनाला अन सांगाव
प्रेम केलंस हाच तुझा गुन्हा ...
अबोल अबोल प्रीत माझी
कळेल तरी तुला कशी
आणलेली फुले तुझ्या साठी
हातातच माझ्या लाजून लपती

खोल खोल कविता डोळ्यातली
वाचणार तरी तू कशी
भाव रंग गहिरे तुझ्या डोळ्यात पाहून
कविता माझी पापण्या आड जाई

ओढ गोड हि तू दिलेली कधीतरी
तुला जाणवणार तरी कशी
भीती हि प्रीती हि तुझ्या सोबतीची
वेडी माझी प्रीत अधुरी अधुरी च राही
तू आलाच नसतास आयुष्यात तर ...
तर .फार काही फरक पडला नसता ...

पण कदाचित पहाटेच्या हवेला
माझ्याभोवती गुणगुनाव्स वाटल नसत ....
पूर्वेच्या रंगान बहरलेल्या आभाळाला
क्षणभर मलाही डोळ्यात साठ्वावस वाटल नसत ...
मिटलेल्या डोळ्यात त्या आभाळात तुला पाहून
माझ केशरिया पूर्व दिशा होण .... झाल नसत ...

तू आलाच नसतास आयुष्यात तर ...
तर .फार काही फरक पडला नसता ...

तेच दिवस त्याच रात्री
तेच ध्येय अन रोजचीच धास्ती
पण धावत्या दिवसातही क्षणभर थांबून
स्वतःची स्पंदन ऐकावीशी वाटल नसत
स्पन्दनाना बोलता येत , गाता येत
हसता येत , अन रडता हि येत
शब्द बद्ध होऊन लयीत जिवंत कविताही होता येत
क्षणांना स्पन्दनानी अस जिवंत करता आल नसत .....

तू आलाच नसतास आयुष्यात तर ...
तर .फार काही फरक पडला नसता ...

तोच चंद्र आणि त्याच चांदण्या अन तीच निशा
पण चांदण्यानाही सुगंध असतो
तुझ्या शब्दांसारखा ... तुझ्या श्वासांसारखा
तुझ्या माझ्या श्वासांच्या लयीत
दरवळ नार्या त्या सुगंधाला स्वप्नांच्या कुपीत
.................... मी हि जपलं नसत

तू आलाच नसतास आयुष्यात तर ...
तर .फार काही फरक पडला नसता ...

आधी हि मी जगत होतेच न आनंदाने
अशीच जगत आले असते नेहमी
पण क्षण क्षणातल जीवंतपण
माझ्यातल तुझ रेखीवपण ........
गालावरच्या खळीत जस नेहमीच विरघळून जात
अन शब्दात खुलून येत .. ते फक्त झाल नसत
तू आलाच नसतास आयुष्यात तर ......
वाटेवरच्या सावल्यांशी
मन माझ बोलत राहत
नसतोस जेव्हा तु सोबत
कोणीतरी माझ्याबरोबर चालत राहत

कुठे असशील कसा असशील
हजार शंका मनात येती
मला विसरला तर नसशील
किती प्रश्न उत्तरे नसती

आठवणींच्या अडगळीत
डोळे मिटून बसत
....... नसतोस जेव्हा तु सोबत

थांबत नाही काहीही ....
ना सूर्य ,, ना दिवस ... ना ,,,, रात्र
ना रोजच जगन .. हसन ... बोलन
थांबत नाही कधी मी हि

आतल्या आत पण काही होत राहत
आठवलास कि .......
वाटत सर्व थांबल्यासारख
........... नसतोस जेव्हा तु सोबत
असे ओघवते शब्द तुझे
अश्रू ओघळावे वेडे जसे . न थांबता
अश्रू ओले कि शब्द ओले ..
कळले नाही ..भिजतेय पण मी या श्रावणात ..!!!

भर पावसात भर रस्त्यात
... काहीच कसलेच भान ..न तुला .. न मला
कसे शब्द अटकले तुझ्या कंठात
फक्त .. धरून ठेवलास हातात हात !!!


थेंब थेंब पापण्यांवर ....
कोरड्या ओठांवर भाव सुकले
तुझ्या नेहमीच्या हास्यास ते हि आज मुकले
थरथरत राहिले काही तुझ्या नयनात ...काही माझ्या मनात !!!
असेच कधीतरी ...
तू निवांत असताना
तुझ्या डोळ्यातली स्वप्ने मला दाखवलीस

खरच सांगते तेव्हापासून
माझी स्वप्ने मी पाहायचीच सोडलीत

असेच कधीतरी
तू निवांत असताना
तुझ्या शब्दांची कविता मला ऐकावलीस

खरच सांगते तेव्हापासून
माझ्या कवितेतली काही शब्द हरव्लीत

असेच कधीतरी
तू निवांत असताना
हातात हात घेऊन नकळत एक वाट दाखवलीस

खरच सांगते तेव्हापासून
त्याच वाटेवर आजही पाउले माझी अड्लीत

असेच कधीतरी
तू निवांत असताना
नजरेच्या स्पर्शाने मौन गुज सांगितलीस

खरच सांगते तेव्हापासून
स्पर्श सारी सारीच कशी मौन झालीत ..!
का कशी कुठे कधी
तुझ्या प्रेमात पडले ,,, माहित नाही
प्रेम प्रेमच म्हणतात
हेच असते का प्रेम ,,,, माहित नाही
नाही केली पर्वा तुझी
आज छळते तुझी काळजी ... का माहित नाही
सांगाव तुला काही तर
शब्द हरवतात माझे ... का माहित नाही
आज तू टाळलेस मला तरी
मी तुला विसरत नाही ... का माहित नाही
तुझ्या हृदयातही मीच आहे
कसे मला जाणवते .... का माहित नाही
नाही मी तुझी होणार
तरीही मी तुझी आहे ... का माहित नाही
वेदनेचे नाते हृदयाशी
तुझ्या आठवणींचे ... का माहित नाही
येतात अश्रू सहज
कंठ दाटतो बोलता बोलता ... का माहित नाही
कशी जगणार मी आता
तुझ्याविना ,,,,,,???? ... माहित नाही
क्षितीज आले मुठीत माझ्या
क्षण बघ थांबले क्षणभरी
भरून वाहतील शब्द तुझे हि डोळ्यातून
नको बोलूस थोडा वेळ तरी

अबोल झाली संवेदना
ऐकू दे जरा तुझ्या स्पंदना
नको विचारूस आता काहीही
अंतरी नाद उमटला ऐक काही

बाहूत आज जग माझे विसावले
नको हरवायला पुन्हा आता
भीती हि मनात उगाच दाटू येई
राहू दे जग माझे काही क्षण माझ्यापाशी

पुन्हा सरसावतील पाउले तुझी
अन जाशील पुन्हा दूर त्या देशी
मौन साथ तुझी सामाऊ दे अंतरात थोडी
नंतर वहाय्चीच आहेत शब्दांची ओझी
सुचते कधीतरी
असेच तुला आठवले कि
सुचते कधीतरी
तुझे शब्द वाचले कि
सुचते कधीतरी
आत खूप साठले कि
सुचते कधीतरी
वेदना शब्द होऊ लागल्या कि
सुचते कधीतरी
तुला काही द्यावेसे वाटले कि
सुचते कधीतरी
तुझ्या कौतुकाचा मोह झाला कि
सुचते कधीतरी
असेच काहीतरी ,,,,
अजून स्पर्श ओले
तुझ्या आठवणींचे
मन जरी झाले कोरडे
तुझ्या ज्वलित शब्दाने

अजून ओठी हुंकार
निशब्द तोच नकळता
स्तब्ध जरी झाले
तुझ्या अनपेक्षित जाण्याने

अजून श्वास गंधित
तुझ्या धुंद मिठीतले
वेदनामय काही उसासे
जरी तुं हृदयी ठेवलेस काहीसे

अजून मी तुझ्यातच
आहे आहे हरवलेले
जरी शुद्धीवर आणलेस
तोडून स्वप्न सारे

अजून दिन तुझे
अजून रात्र तुझी
जरी नाहीस तुं माझा
माझे माझ्याकडे काहीच न उरले
बहरू आले श्रावन्मय रूप माझे
हृदयवनात मयूरपाऊले
तुझ्या शब्दांची थिरकली
धुंद तू होता प्रीतीत सख्या
ओठांवर कविता थरारली

भिजरी भिजरी पाउलवाट
निळसर नेत्र डोहा काठी
दव बिंदू परी थेंब चकाकले
ओघळले मज पापण्यानवरी
डोहात निळ्याशार मनीची पाऊलवाट घसरली

ओले कुंद मखमली स्वप्न तुझी
गुलाबी तळहातात माझ्या आली
तुझ्या केसांवरून निथळले थेंब काही
माझी स्वप्न मऊ मऊ ओलसर झाली
लाजरी प्रीत आपुली सख्या श्रावणात बहरली
"
नाही रे मी कुठे रडतेय
हे अश्रूच वेड्यासारखे वाहतात
तू जातो आहेस न दूर
आपोआप बाहेर येऊन तुला पाहतात

नाही रे मी कुठे काय बोलले
हा हुंदकाच राहून राहून बोलतोय
कशी जगणार मी तुझ्याविना
माझ्या ऐवजी तोच तुला विचारतोय

नाही रे मी कुठे थांबवतेय तुला
हा हात च तुझा हात सोडत नाही
काही क्षणासाठीच चाललास न
विचारतोय तुला नाते तर तोडत नाहीस ?

नाही रे मी कुठे झालेय बेभान विरहात
हा देह च माझी साथ देत नाही
विसावालीय तुझ्या खांद्यावर मान माझी
जाण्याआधी एकदा का तुझ्या मिठीत मला घेत नाही ?
हो नाहीच कळत मला
तुझ अस वागण
जेव्हा मला बोलायचं असत
तेव्हा मला तू टाळण

हो नाही कळत मला
मी निरपेक्ष राहूनही
तुझ्याकडून एका शब्दाची
तरी अपेक्षा माझी ठेवण

हो नाही कळत मला
माझ अस्वस्थ होण
तू सुखी असतोस तेव्हा नाही
पण तुझ्या दुखांत माझ रडण

हो नाही कळत मला
खूप राग येतो तुझा तरी
खोटा आहेस , फसवा आहेस
तरी तुझ्याकडेच मनच वळण

हो नाही कळत मला
तुला वारंवार माफ करण
कधीच मी नाही होणार तुझी तरी
तुझ्यात मुद्दामून माझ जगन

हो नाही कळत मला
मी विसरू लागले तुला कि
तुझ विरहगीत गान
पुन्हा मला तुझ्यात गुंतवण

नाही आता नको समजावू काही
तुलाही नाही कळणार कधी
दोष तुझाही नाही अन नाही माझाही
हि वेळ च हा काळ च फसवेगिरी
खर खर सांग मला मना
काय आहे चालू तुझ सध्या
उगीचच त्रास देतोस मला कि
खरच होतोय त्रास तुला

खर खर सांग मला मना
कुठे घेऊन चाललास मला
कोणीतरी दिशाभूल केलीय तुझी
कि तूच दिशा हीन करतोस मला

खर खर सांग मला मना
नेहमीच का हर्ल्यासार्खा आहेस सध्या
तुलाच जिंकल आहे कोणी कि
कुठ तरी हरवून आला आहेस मला

खर खर सांग मला मना
तुझ तरी तुला कळतंय का ?
रोज आतल्या आत भांडतोस किती
घुस्मात्तोस कधी उगाच रडतोस
खरच माझ्याशी भांडणाचा काही अर्थ असतो
कि असतो फक्त रडण्याचा बहाणा

खर खर सांग मला मना
खर काय हे तरी समजतंय का ?
तुझी कोणीतरी प्रतारणा करताय
कि तूच करतोस माझी प्रतारणा

तुझ खर काय खरच नाही काळात मला
पण तुझी ओढ जाणवते मला
तुझ्या भाबड्या मनाची वेदना राद्व्तेही मला
मनालाही मन असत कळत मला
पण खर खर सांगू तुला .....
सगळाच मनासारखं होत नसत बाळा..!
तू थंड एक झुळूक
भर पावसात अलगद
जवळ येऊन शहारे आणणारी

तू तप्त एक श्वास
दूर असूनही भास
बोली त्याची ओठांवर थरथरणारी

तू एक गोड स्मित
मला खुणावणारे
मग मी नुसतीच गालात हसणारी

तू आता माझे जीवन
माझे अस्तित्व जसे
मी असूनही त्यात तुझ्यातच उरणारी
थांबवू कशी सख्या तुला रे
श्वास दाटले कंठाशी
आठवणी पापण्यांशी
पाहू कशी सख्या तुला रे
ओठात शब्द सुकले
मौनात विरून गेले
साद घालू कशी सख्या तुला रे
थिजून देह जागी
निर्जीव होऊन उभा
हात कसा देऊ सख्या तुला रे
प्राण प्राण गोठला
श्वास श्वास आटला
जिवंत पुन्हा होऊ कसे रे
जातोस तू दूर दूर
परतूनही न पाहता मागे
निरोप सांग देऊ कसा सख्या तुला रे
हा प्रश्न मजला पडला असा
उत्तर तुला देता येईल का ?

का होते क्षणात मन
दूर असे तुझ्या पासून
अन वाटते आता सहज
विसरेल तुला मी हसून

दुसर्याच क्षणी समोर तू
अन जाणीव दूर कधी नव्हताच ना !
हा प्रश्न मजला पडला असा
उत्तर तुला देता येईल का ?

जगले तुझ्यात क्षण काही
अजून हि उरली असेल थोडी
तुझ्यात मी माझ्यात तू हि
शब्दांनीच केली होती खोडी

प्रेम असे ना असते परी
विरहाचे तुझ्या वाटे मज भय का ?
हा प्रश्न मजला पडला असा
उत्तर तुला देता येईल का ?

मनात माझ्या प्रतिमा तुझी हि
वेडे मन पर खोटे असेल का ?
म्हणतात मनापेक्षा विवेक मोठा
तो हि तुझ्यातच मला दिसतो का ?

आता जन्माचे नाते , संपवतेय हे बंध
जाताना तुला निरोप देता येईल का ?
हा प्रश्न मजला पडला असा
उत्तर तुला देता येईल का ?
तुझ्यावर .. आणि माझ प्रेम
काय वेडा आहेस का?

हा आता कधी कधी
जेव्हा कुणीही नसत
आसपास .. म्हणाव तस
मग बोलावस वाटत तुझ्याशी सहज

अन कधी तू नसलास
बोलायला कुठे हि
मग आपोआपच आठवतात
तुझे शब्द न शब्द... सहज

पण पण म्हणून काय
तुझ्यावर ... आणि माझ प्रेम
काय वेडा आहेस का ?

हा आता कधी कधी
आजूबाजूला असते गर्दी
अन मनात एकांत एकटा
तूच त्याचा होऊन जातोस सहज सोबती

स्पर्श कुणाच्या नजरेचा होता
मन भिवून शोधते तुझ्या
तुझ्याच शब्दांची मऊ कुशी
निर्धास्त असते मी तुझ्या जवळ येउनी

पण पण म्हणून काय
तुझ्यावर ... आणि माझ प्रेम
काय वेडा आहेस का ?

हा कधी कधी श्वास गोठतो
परक परक जग होत
अन जेव्हा खूप रडावस वाटत
कुठलीही वेदना तुझ्पाशीच व्यक्त होते

मग रडून रडून जीव
कोरडा कोरडा होतो
तुझ्याच शब्दांचा ओलावा
पुन्हा जीवास संजीवनी होतो

पण पण म्हणून काय
तुझ्यावर ... आणि माझ प्रेम
काय वेडा आहेस का ?

Thursday, December 23, 2010

कधी तरी आकाशातल चांदणं
मोजण्याचे वेड लागयच तिला
तर कधी नुसतंच बघत बसणार
जणू चांदणं काही सांगायचं तिला ....
त्याला आठवून मग हळुवार तीच हसणं
आठवणीची बरीच निमित्त भेटायची तिला

आता ती चांदणं कधी मोजत नाही
ओंजळीत त्यांचा प्रकाश हि घेत नाही
चांदण्यांच हसणं , त्यांचं असणं..सारच ..!
.असूनही नसल्या सारखच तिला
हसून स्वागत आता सार्याच क्षणांचे
आता भेटत नाही रुसण्याची निमित्त तिला

कधीतरी स्पन्दनाशी जुळले जे बंध मैत्रीचे
तेव्हडेच निमित्त श्वास शब्दांशी जोडायचे तिला
असेच रहावे निरंतर हे स्पंदन अंगण बहरलेले
भेटत राहतील लिहिण्याचे निमित्त हि तिला ..!
.............
इथे शब्दांचे वार ...कसे
झेलीत सूर... गीत तुझे झाले
विश्वस्त येथे कोण..... कोणास
माझ्यातले हि.. ते... आता अस्तास गेले


न दोष कुणाचा ..माझाच सारा
होते काही समजवायचे मला.. आयुष्याला
ठेच पायी लागली ..जी स्वागत तिचेही
वाहिले जे रक्त ते हि ...अर्थास आले


निमित्त ... निमित्त ... निमित्त कसले ..?
जीवनावरचे प्रेम .. मात्र प्रगल्भ झाले
नाही बघणार बंद ते दार .. तुझ्या घराचे
चालणे आता धर्म .. जगणे निमित्त झाले
झोका माझा आज उंच जाईना
आभाळ दूर झाले माझ्या मनीचे

शब्दात आज माझ्या सूर येईना
साज स्तब्ध झाले माझ्या मनीचे

मैफिलीत माझ्या तो रंग येईना
बेरंग क्षणात चित्र माझ्या मनीचे

निमित्त काही आता ध्यानी येईना
खोडले बहाणे मीच तुझ्या भेटीचे

निमित्त वाट भावनांना कुणीच देईना
रुसलेत नीर ही माझ्या नयनीचे
तुझ्या येण्याने .. जो बहर आला
तुझ्या जाण्याने ,, तो गेलाच नाही
अजून तो बहरतो फुलतो अंतरी
जणू तू कधी दूर गेलाच नाहीस

खर तर कदाचित तू नव्हतास तोच
तो तर माझ्या कल्पनेचा रंग होता
मला हवा होता तसा तो एक संग होता
म्हणून तू भेटलास पण तो तुझ्यात दिसलाच नाही
तू दूर गेलास पण तो दूर गेलाच नाही ..

कुणाच्या जाण्याने उतरेल .. असा हा रंग नसतोच
अंतरीच्या या विश्वाला सदैव सुंदर तो ठेवतोच
नाही विस्कटले नाही विखुरले .. हा थोडी अस्वस्थ झाले
त्या अमूर्त स्वरूपाला प्रेमाच्या, मी मूर्त रूप दिलेच नाही
निमित्त बनून राहिले जे अंतरी ते आजही आहे
शब्दांच्या जगात फिरणारा, तू अंतरात फिरकलाच नाही
अजून तो बहरतो फुलतो अंतरी
जणू तू कधी दूर गेलाच नाहीस
कस हसावं
हसण निर्जीव झालय
जखमा भरल्या
पण त्याच व्रण राहिलंय
कस जगावं
तुझ्या बरोबर जगण हरवलंय
कुठे शोधाव
अस्तित्व माझ गहाळ झालंय

कसे गिळावेत
अश्रूंचा बांध फुटलाय
कसा अडवावा
श्वास कंठात आलाय
कसा मिळवावा
विश्वास हि हरवलाय
निमित्त नियतीने का रचले
खेळ मनाचा झालाय
चालले मी नेहमीच जी
ती वाट अनोळखी होती
घट्ट झाली नकळत जी ती
साथ नेहमी क्षणांची होती

जुळले शब्द माझे जयाशी
भाषा ती वेदनांची होती
जडले नाते कुणा हृदयाशी
वीण ती उसवल्या जखमांची होती

नेहमीच रुतले ओल्या चिखलात
मातीच्या सुगंधाची मनी जान होती
निव्डूंगानेही घातली साद कधी
माझ्या अश्रूंची हि त्याला तहान होती

निसटले प्रवासातले क्षण काही
लेखणीला तेव्हा शब्दांची वाण होती
तटस्थ कधी अलिप्त हि राहिली ती
कधी कधी भवना हि ती प्राण हीन होती

नव्याने पुन्हा जगण्याचे एक निमित्त
प्रत्येक क्षण एक आठवण होती
आताशा तक्रार जगण्याची कशाला
अश्रुनी जिंकली ती हसण्याची आव्हान होती
श्रावण तो सरला ... देहभान विसरून बरसणारा
आभास तो संपला .. इंद्रधनू च्या मोहक रंगाचा

पुन्हा ती पायवाट .... अन उडणारे धुळीचे धुराळे
हृदय धरेचे .... पुन्हा भेगाळलेले , तडकलेले

तहानलेली लेखणी ..... शुष्क फक्त रेघोट्या कागदावर
विरक्त भाव नजर ..... दोन कोरडे शब्द ओठांवर

ओसाड मनाचे गाव ..... गुंडाळून बसले स्वतःशीच
उजेडाचे निमित्त ..... जुळवून घेतले अंधाराशीच
ओंजळ शब्दांची रिती रिती
मनाच्या कड्याकपार्यात
भाव नदी एक आटलेली
ओल सुगंधी मात्र अनुभूती रुक्ष आहे
....सध्या तरी कविता माझी मूक आहे

सांजवेळी परतीच्या दिशेच्या
काही रंगछटा उमलायच्या कधी
ओरखडल्या सारखे चूरगळलेले
मनाचे आकाश सध्या सांजवेळी
संवाद माझाच माझ्याशी होतो कुठ आहे ?
....सध्या तरी माझी कविता मूक आहे

अलगद सहज भेट व्हायची
माझी माझ्याशी आधी मधी
प्रत्येक भेट मग एक निमित्त व्हायचे
उसळून बहरायचे शब्दांतरी
मीच माझ्यापासून सध्या खूप जणू दूर आहे
..... सध्या तरी माझी कविता मूक आहे
बस एक क्षण पुरेसा
तुलाच तो पकडता येतो
बस एक च शब्द पुरेसा
तुलाच तो बोलता येतो

सक्षम असत मन माझ
हळुवार जागेवर त्याच्या
एकमेव तुलाच तो
घाव कसा देता येतो

खरे खोटे कुणास ठावे
वेदनेचा भार मात्र होतो
दोष तुझा नसतो तरी
माझ्या वेदनेचे तू निमित्त होतो
माझ्या मनाच
तुझ्या मनाच रोजच भांडण
सोबत असलो कि रुसवा
एकांतात तुझ्या आठवणीची गुंफण ..

आधी तू निमित्त वाटायचास .
माझे आयुष्य बहरण्याचे
आता आयुष्य निमित्त वाटतंय
एकमेव तुझ्यावर प्रेम करण्याच
....... तुला भेटण्याच

माझ्या मनाच
माझ्याच मनाला हे सांगण
हृदयावर हात ठेवून मग
तुझ्या नावाची स्पंदन ऐकण
....... अन लाजळूपरी मिटण

आधी शब्द शब्दातून
निमित्त होऊन तू रहायचास
आता शब्द निमित्त झालेत
तुला रेखाटण्याच ..... तुला मांडण्याच

माझ्या मनातल
तुझ्या मनातल आभासाच रुपेरी चांदण
अनुभूतीच्या आभाळावर पडत
निमित्त होत कधीतरी काही होण
हलकेच होत डोळ्यातून त्यांचं सांडण
थेंब न थेंब पावसाचा
हातावर झेलून बघते

थंडावलेला जीव माझा
तुझ्या विरहात वेडावलेला
कोरड्या शब्दात तुझ्या
ओलाव्याचे निमित्त शोधते





निमित्त...

स्पंद न स्पंद हृदयाचा
तुझे स्पंदन होऊ पाहते

कोमेजलेले मन फुल हे
मान टाकून जरी विसावले
पाकळ्या पाकळ्या तून ओघळेल असा
तुझा प्रीतरंग शोधते

शब्द न शब्द विस्कटलेला
विरह्गीतच बघ रचले जाते

तुझ्या नसण्याची जाणीव
जडावलेल्या पापण्यांनाही
ओझे अश्रुंचे रात्र वाहते
निद्रेवीन रात्र सरण्याचे निमित्त होते
निवांत कुठल्यातरी कोपर्यात
निपचित पडलेलं मन
वारंवार घरभर फिरून येत
अजूनही काहीसा गंध तुझा
तू स्पर्शिलेल्या क्षणांच्या
गाठोड्यातून सोडून श्वासात भरत

त्या तिथे आडोश्याला
काही तुझे शब्द कानोसा घेतात
शोधता फक्त सावल्या उरतात
खळखळून कधी अंगण
तुझ्या हसण्यान फुलत
तू नसता कुंडीतल फुलही बिचकत हसत

पडवी,गच्ची, मुकी मुकी
माझ्या एकांताला पहिल्यांदाच कळल
तुझ्या विन तेही सून होत
सगळ काही तेच आहे तरीही
निमित्त पडछाया तुझ्या जाण्याची त्यावर
खरच मन , घर तुझी खूप वाट बघत
तू अन मी पाहिलेल्या
स्वप्नांच्या उसळत्या लाटांवर
पुन्हा काही शब्द तरंगत ठेवून
........ तुझी वाट पाहतेय !

तुला हे करायचं तुला ते करायचं
तुला हे मिळवायचं तुला ते कमवायचं
तुझ्या व्यस्ततेत माझ्यासाठीचा
एक मोकळा क्षण शोधतेय .. तुझी वाट पाहतेय

जग विस्तारलं तुझ ... विस्तारत गेल
माझ जग मात्र तुझ्यासोबत हरवत गेल
तुझ्या अवाढव्य जगात माझा 'तू' शोधतेय ..... तुझी वाट पाहतेय !

कुठल्यातरी निमित्तन तू जवळ आलास
तुझ्या ओझरत्या स्पर्शान दूर जाऊनही जवळच राहिलास
पुन्हा असेच एक निमित्त .. मनस्पर्शी शोधतेय
..... तुझी वाट पाहतेय !

कोसळणारा पाउस एक वाट निवांत
भिजल्या स्वराने तू दिलेली हाक
आर्त तुझी साद आठवून ..एकटक पाउस बघतेय
... तुझी वाट पाहतेय ..
ठरवायचे पुन्हा पुन्हा कितीदा
हा संघर्ष आता जिंकायचा
नाही हरायचे मनापुढे
नाही प्राण कंठाशी आणायचा

पण का कुणास ठावूक
तुझ्या दुराव्याचे निमित्त होते
आणि मग जगण्याचे
सगळे बळ च क्षणात गळून पडते

ठरवायचे पुन्हा पुन्हा कितीदा
खूप काही अजून करायचे आहे
आयुष्याच्या शिखरांना गाठायचं आहे
तू नाहीस तर सगळे निरर्थंक वाटते

का कसे जगण्याचे निमित्त
तुझ्याजवळ येऊन संपते
जाहले निमित्त काही
अन खळखळून मी हसले
माझ्या अश्रुना असे मीच
आज खूप छळले

कसली दुखे कोणती चिंता
अग वेडे हि सगळी निमित्तच न
अस म्हणून माझ्याच शब्दांनी
मला असे खडसावले

जाहले निमित्त काही
अन खळखळून मी हसले

हो पुन्हा निमित्त आणि निमित्त
रंग पुन्हा भरायचे
जे जे मिळाले जे जे आहे
निमित्त होऊन गंधाचे दरवळायचे

जाहले निमित्त काही
अन खळखळून मी हसले

आयुष्य असे शब्दांनी बहरले
निमित्त होऊन तुझ्यात काही
शब्दांश आहेत काही सामावले
सारांश त्यांच्या निमित्तांचे शोधायचे

पुन्हा माझ्यात मी निमित्त पाहिले
जीवन गीत आनंदाने गाऊ लागले
जाहले निमित्त काही
अन खळखळून मी हसले
होतीस तू दूर
ते हि बरे होते
दुख मनाचे मनातच होते
प्रेमाने असे गोंजारून
नको होउस निमित्त
मन माझे भरून येण्याचे


काय सांगू ग
कसे सांगू तुला
जपलेस तू माझ्या मनाला
मी मात्र गमावले तुला
जवळ येऊन असे पुन्हा
नको होउस निमित्त
माझ्या दुखर्या जखमेचे

तू मुग्ध अशीच
रहा गंध होऊन दरवळत
तुझ्या स्वप्नांचे
वळणाच्या वाटेवरचे
होईल ग मी हि निमित्त
कधीतरी तुझ्या हास्याचे
नाहीस तू आज
जवळ
तरीही तुझ्या खुणा
आसपास
तुझविन सख्या कविताही
माझी
माझ्या सारखीच
शांत उदास

नाही तुझ्यावीण
मी काहीच
तुझ्यातच समावले
का कधी
तुझ्या आठवणीची
मांडून आरास
जीवनात साज्वलेय
मी खोटे भास

नाही नाही नाही
मान्य मला
तुझ्याविना क्षणाचे
हि जगणे
का आहे तूच सांग
मनाला तुझी आस
तुझ्याच वेदनेची
वेदना अंतरात

नाही कळत मला
योग्य अयोग्य
कळत एवढंच तूच
आहेस खास
निमित्त झाली माझी
अगतिकता
वाटते बांधावे तुला
शब्दात ,, अन ठेवावे
श्वासात ,, हृदयात !
जीव तिचा त्याच्यात
किती गुंतला कळेना त्याला
तिच्या हास्यात लपलेला हुंदका
त्याच्या मनाला दिसेना

अवघडच असत प्रेम जडते त्याच्यावर
ज्याला त्याची काही किंमत नसते

असूनही तिच्या प्रेमाची जाणीव
तिचा स्वीकार त्याला करता येईना
नियतीची गहन परीक्षा किती हि
तिचे अगतिक प्रेमात होणे त्याला पाहवेना

अवघडच असत स्वतःच प्रेम लपवण
अश्रुना खळाळत्या हसण्यात खपवण

हि वाट प्रेमाची कुठे सर्वांसाठी
खर्या प्रेमासाठी मने आतुरलेली
त्यात आहे कोनाच्तरी खर प्रेम आपल्यावर
हीच गोष्ट पुरेसी आहे नशीबवान ठरण्यासाठी

अवघडच असत खर प्रेम मिलन कोणाच तरी
सुदर असते प्रेमच निमित्त आयुष्यभर जपण्यासाठी
कधीतरी वाटत कि
काय गरज असते ?
कोणालातरी स्वतःबद्दल
समजून सांगण्याची


कधीतरी वाटत कि
काय गरज असते
कोणाशी मनमोकळ
आणि खूप खूप बोलण्याची

कधीतरी वाटत कि
का विश्वास एवढा
ठेवावासा वाटतो
ओढ विश्वाच नात जपण्याची

कधीतरी वाटत कि
आयुष्याला एक दिशा
आणि मार्ग सापडला तरी
निमित्त शोधून काहीतरी
काय गरज असते
जुन्या वळणावर थांबून
क्षणभर थांबूनच राहण्याची
काहीच नाही बोललास तू
तरी सगळे मला उमगले
नजरेनेच तू माझ्या प्रेमा
मला दूर असे का केलेस ?

नव्हतास तू माझा कधीच
जाणूनही भास खोटे जपले
आज संपवताना सगळे
तुझ्या डोळ्यातले पाणी का लपले ?

खेळायला नको होता हा
जीवघेणा खेळ आपण
आता उत्तर मागताय मला
माझ्याच ह्रुदयाच स्पंदन

काहीच निमित्त आता दिसत नाही
दूर जाऊन हि तू दूर जात नाही
तू मुक्त करण्याचे फक्त निमित्त झाले
मी तर कायमचे तुझ्यातच उरले
जा जा विसरून मला
जाताना मलाही शिकवून जा
विसरायचे कसे तुला ?
मलाही सांगून जा

प्रेमात तू नव्हतास माझ्या
आजच तुला शोध लागला
या शोधावर शिक्का मोर्तब
माझ्या अश्रुंचे घेवून जा

सहज तू सोडलास हात
राहील म्हणालास मैत्रीची साथ
असे गोड नको बोलूस जाताना
जगण्यासाठी वेदनेचे निमित्त देवून जा

विसरले आता चालताही येत नाही
नकळत हात तुझा हात शोधतो
अपंगत्व मनाचे कायमचे आता
आठवणीच्या कुबड्या निमित्ताला ठेवून जा
तू असा अस्वथ का आज ?
तुझी नजर आज वेगळी
कोणती वेदना तुझ्या उरी ?
कल्पना तर दे थोडी

वादळ आहे तुझ्या मनात
तुझ्या डोळ्यात हि दिसतंय
तुला पोळतय काहीतरी
ते मलाही चटके देतंय

तुझी मिठी आज कापरी
श्वासात कसली भीती
सांग कोणती परीक्षा घेतेय
पुन्हा तुझी नियती

शब्द शब्द आज तुझा
बेचैन बचैन होता
तुझा चिंतातूर चेहरा
माझ्या चिंतेचा निमित्त होता

हि कसली धग सख्या
एकटाच तू सहन करतोस
तुझ्या कोरड्या हास्यात
माझे हास्य दहन करतोस

सांग आता तरी जीव व्याकुळला
रडवेल्या तुझ्या भावनाही
का तू बांधून ठेवल्यास
आज मुक्त हो कुशीत माझ्या
हो व्यक्त होता येईल जसे
नाही करता आले काही तरी
तुझ्या सह रडण्याचे आहे निमित्त माझे
आज काल सत्यापेक्षा
मला असत्यच जास्त आवडतंय
हृदयावरती हात ठेवून ते नेहमी
आल इज वेल म्हणतय

इथे उमगतेय मला
जगण्याची नवी दिशा
कुणीतरी ठरवलेल्या संस्कारापेक्षा
फक्त माझ्या मनाची भाषा

वाईट हेतू नसतो सत्याचा
पण कटू असत हे हि सत्य आहे
एक असत्य प्रेरणेच निमित्त होताना
मी कितीवेळा अनुभवलं आहे

फसव ,दुखावणार , लबाड हि एक
निस्वार्थ , क्षणिक , सद्हेतू असणार एक
असत्याचे दोन रूप मी पाहिले
हे हि एक सत्य निमित्त प्रगल्भतेचे झाले
कधी मनाच तप्त पण जपलं
कधी डोळ्यातलं थंड पण
या जीवनाला नेहमीच मिळाल
जपण्याच एक निमित्त पण

कधी विश्वासाचा श्वास जपला
कधी निराशेतली आस पण
या जीवनाला नेहमीच कळल
हरताना हि एक जिंकण पण

कधी मानाच मान पण जपलं
कधी लाजिरवाणे क्षण पण
या जीवनाला नेहमीच दिसले
बेरंग पाण्यातल इंद्रधनुष्य पण

हि माझी वाट हा माझा रस्ता
येथे माझे असणे हि आणि नसनेही
या वाटेवर नेहमीच गळून हि उरत आले
हरण्याच्या नावाखाली हि जिंकत आले स्व पण
पाहू दे एक स्वप्न शेवटचे
तुझ्या साठी
होऊ दे निमित्त तव प्रीतीचे
काही क्षणासाठी

हे प्रेमगीत लिहू दे अखेरचे
तुझ्या साठी
होऊ दे निमित्त तव प्रेरणेचे
काही क्षणासाठी

बोलू दे मनाला तुझ्या मनातले
तुझ्यासाठी
होऊ दे निमित्त प्रतिसाद प्रीतीचे
काही क्षणासाठी

पहाट उद्याची वेगळी रंगू दे आज
तुझ्यासाठी
होऊन निमित्त विरहातल्या अश्रुंचे
वाहू दे आज तुझ्यासाठी
हि प्रीत तुझी
मज धुंद करी
भेटीची ओढ तुझ्या
आतुर हि घडी

विसरून पाश
तुझे तुझे
होऊ दे आज
बेधुंद माझ्यात
तुझे , तुझ्यात
माझे श्वास

निमित्त कसलेही
करून घे जवळ
सोड सख्या
मनातली अढी

हि प्रीत तुझी
मज धुंद करी
भेटीची ओढ तुझ्या
आतुर हि घडी
वसते हृदयात माझ्या
निमित्त एक तव शब्दांचे
देई साथ कायम आता
जीवन नव्याने जगायचे

काय हे थोडक्या क्षणात
भरलीत ओंजळ माझी
इतकी का भाग्यवान मी
दिलीत करून ओळख माझी

निमित्त आहे कसलेतरी
दुरावा पुन्हा येत आहे
निश्चित नाही अजून पण
पुन्हा कदाचित भेटणे आहे

जाई , काका ,दर्शना
कोमल ,अजित ,सचिन ,
गीत हो गीतच ,स्वाती आणि करुणा
काहीतरी म्हणायचे होते खरे
पण शब्द काही सुचेना ...!!!

हा आनंद सोहळा आहे माझा
माझ्या हि स्पंदनातला नाद जसा
श्वास येथेच काही सोडून जातेय
तुमच्या शुभेच्छांचा आशिष हवा
ती नाही घरात
पण तिनेच घराचा
ताबा असा घेतलाय

ती गेल्यानंतर
ती होती तेव्हाही नव्हता
एवढा तिचा वावर वाढलाय

तिचे भरलेले कटाक्ष
टाळून घरात आले अन कळले
घराचा हि तिच्यासम कंठ भरलाय

हसत खेळत घर
तिच्या अवती भोवती असायचं
घर विचारतंय,, आता कस हसायचं ?

नव स्वप्न तिची
याच घरात तिने पहिली ,,साकार झाली
तिने दिलेले घरपण आज कळू लागलंय

तिची आठवण मला
काढायचीच नसते कधी अशी
काय करू ?.. एकदम च सगळ जिवंत होऊ लागलंय

आता तर ती हि सुखी
तिच्या नवीन घरात रमेल अशी
शुभेच्छा देऊन हि तिला मनातल घर तुटू लागलंय

आनंद तर आहे
पण तिच्या आनंदात हि
माझ्या मनाचे सुनेपण निमित्त होऊन वाहू लागलंय
अरे जा जा रे
जाऊन सांग कोणाला
हा निराशेचा सूर रोजचा
रोजचीच जायची भाषा
मी निमित्त आनंदाचे
कधीतरी ठीक आहे न
रोज हि भाषा नाही कळत मला


अरे जा जा रे
फेकून दे कुठेतरी
शब्द ते जीर्ण जीर्ण
ज्यात फक्त औदासिन्य
निमित्त हो न कधी आशेचे
ते हसतात लाख वेदनात
धाड काय भरली आपल्याला हसायला


अरे जा जा रे
मला नाही बसता येत
दुख असे कुरवाळत प्रेमाने
हा गोंजारते त्यांना कधी कधी
पण निमित्त नाही होऊ देत
त्यांना मलाच संपवायला

अरे जा जा रे
शब्द असावेत स्पर्शीक मन
वेदनादायी असले तरी
देतात ते खूप काही
निमित्त गोड शब्दांचे नात्यांची वीण
तोडणारे सोडून जाणारे शब्द हवेत कशाला

अरे जा जा रे
जाताना हि शुभेच्छा तुला
मिळेल निमित्त असे तुला
जे क्षणार्धात जाळून टाकेल
तुझ्यातली निराशा अन
नवसंजीवनी मिळेल तुझ्या कवितेला
का असे? , का तसे ?
कसेही असले तरी
नेहमीच मनाचे प्रश्न
का त्याला समाधान नसे ?

जवळ असणे हि खंत
दूर जाणेही मोठी खंत
मनाचे काय चालते असे
का त्याला समाधान नसे ?

बोलले तरीही उगाच बोलले
नाही बोलले तर का अबोल राहिले
कसेही असले तरी निमित्त मनाला
का त्याला समाधान नसे ?

हा आनंद कुठे असतो कसा
का प्रत्येक मनाला त्याचे पिसे
निमित्त किती शोधतो , मिळाले तरीही
का त्याला समाधान नसे ?
कुठे हरवलीस ग
रुसून माझ्यावर
अबोल झालीस अशी
सांग रुसवा कुणावर

किती तरी शब्द तुझे
आज असे मला आठवतात
तूच आणलेस इथे मला
तुज साठीच भाव शब्द होतात

तू रागव, दे शब्दांचे फटके
अबोला तुझा आला जीवावर
नाही ग इतकी वाईट मी
मज दुख झाले अनावर

कर कसलेही निमित्त
अन थोडीशी भांड तरी माझ्याशी
पण निमित्त करून जोडू नकोस मला
तुझ्या अन तुझ्या शब्दातल्या दुराव्याशी
नको तोडुस असे पटकन
सक्षम असले तरी
मन माझेही मनच आहे

नको घेउस दुखावून स्वतःला
शब्दांचे माझ्या निमित्त करून
शब्द माझे भावनिक अविचारीपण आहेत

नको देऊस जाताना अश्या आठवणी
निमित्त बनतील ज्या वाहणाऱ्या जखमांच्या
दूर जाण्याचे अजून हि खूप कारण आहेत

नको करूस मैत्री अन जोडूस नातेही
पुन्हा अनोळखी होऊ आपण चालेल मला
नको पुन्हा हे ,आधीच खूप अपराधी क्षण आहेत
येऊन जा एकदा
सहज अनोळखी असल्यासारखे
नाही आणणार मी अश्रू
डोळ्यात पाहता तुला प्रतीक्षेचे

येऊन जा एकदा
सहज तुझ्या मनाला वाट्टेल तसे
नाही पडणार पुन्हा प्रेमात तुझ्या
नाही करणार मनाला वेडे पिसे

येऊन जा एकदा
सहज प्रवाशी जसा हरवल्यागत
नाही हरवणार स्वतःला तुझ्यात
नाही शोधणार मला तुझ्या डोळ्यात

येऊन जा एकदा
सहज सांगून जा कोणी नाही मी तुझा
नाही विचारणार प्रश्न तुला कसलेही
मला मिलालेय्ल्या उत्तरांचे निमित्त बनून जा

येऊन जा एकदा
सहज पुन्हा जगायचे कसे दाखवून जा
नाही थांबवणार श्वास तुझे आठवणीने माझ्या
तोडून हृदय माझे , तुला विसरण्याचे कारण देऊन जा

येऊन जा एकदा
सहज सहज सहज लिहित गेलो म्हण
नाही शोधणार अर्थ तुझ्या शब्दात पुन्हा
निमित्त असे निरर्थक लिहिण्याचे मला हि शिकवून जा ...!!!
दे पुन्हा मला तुझा आसरा
इथे बघ भय आज मनी
दाटला तम , दिशा हीनता
जशी होते मी आधी तुझ्यात विलीन
दे पुन्हा मला तुझा तोच तो निवारा

इथे खोटे खर्याचे , खर्याचे खोटे
खेळ शब्दांचे क्षणात मनाचे
का या जागी न आता राहिला
होता जो तोच भरवसा
दे पुन्हा विश्वास, तो रंग आत्मविश्वासाचा

नको हे उथळ शब्द मजला
नको या अर्थ हीन भावना
होते निमित्त आनंदाचे तसेच
पुन्हा होऊ दे, नको हा ओलावा
दे पुन्हा सबळ मन, नको हा साज दुबळेपणाचा
अनंत आक्नक्षा , उद्दात अन्त्प्रेरना
अगाध श्वास ,अपूर्व चेतना
निमित्त ,,, तुझा अंश ,तुझीच कामना
दे पुन्हा तीच बलाढ्य आशा अन आस्थ निमित्त होण्याचा ...!
गेले वाहून सगळे
जे जे शब्द निमित्त त्यासाठी होते
तुटले सगळे बंध
नकळत मनाने जे बांधले होते

व्हायचे होते हे असेच
माहित होते तिलाही
का तिचे मन मात्र तिला
या वाटेवर चालवत होते

शब्द माझे कलंकित
मलाच वाटू लागले
मन कोणाचे अंकित
का होऊन गेले

आता हा अश्रुपात
थांबवू कसा मी
पुन्हा नव्याने श्वास
घेऊ कसा मी

निमित्त समजून सगळे
विसरेन मी आघात सगळे
खुणा ठेवून काही या रस्त्यावर
होतेय एक मन आता वेगळे
सकाळपासून च ती आरश्यात
स्वताला पाहत होती
एकेक साज एकेक शृंगार
किती वेळ स्वतःला सजवत होती

शामल हिरवी साडी
त्याच्या आवडत्या रंगाची
केश रचनेत माळली होती
फुले धुंध मोगर्याची

रूप तीच खुलुल होत
सगळेच तिला म्हणत होते
तीच मन मात्र
त्याच्या नजरेला शोधात होते

बघाव त्यांना एकदा तरी
म्हणून निमित्ताने गेली समोरून
तो असा अरसिक साजन
गुंग होता कशात एकदाच पाहिलं दुरून

आता ती थकली होती
पार्टी हि आटोपली होती
तिच्या मनासारखं सार
तिच्या मनातच राहील होत

उतरवून साज शृंगार
न्हाऊन रंग सारे पुसले
वार्यावर बहुरू भरू लागले
केस तिचे ओले ओले

स्वतःशीच हसत होती
बरीच हसण्याची निमित्त होती
मागे वळून पाहिलं तर
त्याची नजर तिच्यावर खिळलेली होती

नाही कुठले कृत्रिम रंग
ना जड जड साज शृंगार
किती सुंदर दिसतेस अशीही
त्याची नजर बोलत होती

त्याच्या नजरेतले सौंदर्य
किती साध सुध होत
विसावत त्याच्या बाहूत म्हटले स्वतःशीच
या साठीच तर सगळे निमित्त होत ,,,!!!
आज अस्थिर मन
निशब्द निशब्द भावना
अनाहूत कसली वेदना
मनात अनोळखी काहूर
सांजवेळी हल्ली अशीच हूरहूर

हाती कागदांची चळत
शब्द डोळ्यांसमोरून
होते धावत पळत
पण मनापासून शब्द दूर
सांजवेळी हल्ली अशीच हुरहूर

नकळत आतून काही
उगाच दाटून येत
कोणततरी साठलेले पाणी
डोळ्यात भरून येत होऊन पूर
सांजवेळी हल्ली अशीच हूर हूर

मग सोडून सगळे गुपचूप
गच्चीवर जाऊन उभी राहते
दूरवर मावळत्या रंगानं पाहते
साठवून घेते डोळे मिटून त्यांना भरपूर
सांजवेळी हल्ली अशीच हूर हूर

मग गार वारा हळूच केसांमध्ये
हात फिरवून फिरवून जातो
आसमंत हा कानात काही कुजबुजतो
आताशी दिसलीस आता कुठे निवांत भेटलीस
तुझ्या भेटीचेच निमित्त होण्या सांज होती आतुर

म्हणूनच सांजवेळी हल्ली अशीच हूर हूर
ती आणि तो
एक स्वप्न
एक स्पंदन

ती आणि तो
एकच श्वास
एकच विश्वास

ती आणि तो
जवळ असूनही दूर
नियती हि क्रूर

ती आणि तो
नियतीस तोड
एकच रस्ता एकच ओढ

ती आणि तो
हातात स्वप्नफुले
बंध न दिसणारे

ती आणि तो
मज कळूनही
न कळे

ती आणि तो
मनातच राहिले
अन माझ्या कवितेचे निमित्त झाले ....!!!

ती आणि तो
स्वप्न त्यांचे
किती डोळ्यात आज दिसते
व्यक्त होण्याचे निमित्त होते ....
नको देऊस साद अशी
घाव देऊन जाते कशी
पुन्हा एखाद्या जखमेच
निमित्त मला व्हायचं नाही

नको ते आंधळ प्रेम
नको ती प्राणांतिक ओढ
तिच्या सारखी डोळ्यात प्राण आणून
वाट मला कोणाची पहायची नाही


नको हे ओले शब्द
नको ह्या ओल्या भावना
निमित्त होतात त्या झुरून जगण्याचे
मला असे झुरून झुरून जगायचे नाही

नको ती आस तो आभास
खोट्या स्वप्नाचा खोटा भास
स्वप्नात अश्या गुंतायचे नाही
तुला गुंतवण्याचे निमित्त व्हायचं नाही
आवर सख्या हा
रुसवा आता
भरू भरू आल माझ मन

सावर जरासे
चंद्र रात्रीचे
मऊ मऊ चांदण क्षण

तोड थोडेसे
तुझ्या बाहुतले
गंध धुन्द मोहरते बंध

निमित्त असे
दूर जाण्याचे
जवळ आणतील हे विरहाचे गंध
सरी पावसाच्या ,
आनंद घन घेऊन आल्या
तडकलेल्या क्षणांना
तृप्त तृप्त करून गेल्या
का झाल्या सरींचा वादळी पाउस असा
अश्रूंच्या पुराचं निमित्त होऊन गेल्या

ती ज्योत उजळली
अंधारल्या मनाला
प्रकाशाची सोबत ती
दिलासा अन प्रेरणा हि
वणवा तिच्या पेटण्याचा का पसरला
निमित्त मानून विध्वंसाचा तिलाच दोष दिला

शब्दांना नाही छंद
हृदयांशी खेळण्याचा
त्यांना नाही गंध
कुणा वेदना देण्याचा
आर्त साद हृदयाची , वेदना अश्या व्यक्त झाल्या
निमित्त झाले शब्दांचे अन भावनांचा गुंता झाला
माझ्या वाढदिवसाच्या निमित्तान
असाच मला भेटलास
चांदण्यात काढू या सहल
हट्टच असा धरलास

मीही निमित्त करून कसलेतरी
आले तुझ्या घराच्या गच्चीत
आडोश्याला निवांत पडून तू
चांदण होतास मोजीत

मला पाहून उठून बसलास
किती वेळ नुसत बघत राहिलास
आकाशातल चांदण आता डोळ्यात
पुन्हा एकदा मोजत राहिलास

कसल्यातरी आवाजाच निमित्त
अन आपल ध्यान तुटल
शेजारी ठेवलेल्या फुलांचे
अचानक तुला भान झालं

हातात सुंदर फुले
अन डोळ्यात सुंदर भाव
वाढदिवसाच्या या दिवशी
मनात चांदण्याचं गाव

हातात येण्याआधीच
फुले शहारली होती
स्पर्श त्याचा होऊ नये म्हणून
वरच्यावरच मी धरली होती

शब्दांची आता गरज नव्हती
असाच किती बोलत होतास
मी मिटले होते डोळे , उघडताच
तू कुठेही नव्हतास ....!!

हे सगळ स्वप्न
कवितेसाठी निमित्त होत
कवितेसाठी कल्पनेच असं
विश्वही अलगद आकार घेत