उरलेले मी शोधते आहे
जगण्याचे बंध पुन्हा बांधले
मनाचे सांगाडे जोडते आहे
दिसतात काही चिन्ह त्यावर
जखमांची तरी हि रेशीम स्पर्श
बहुतेक तेच माझ हृदय आहे
काळेभोर तसेच ओलावा तसाच
तेच असतील दोन नयन माझे
पुसट त्यातले चित्र वहायचे बाकी आहे
केलीत गोळा सांध्लेत सांधेही
पुन्हा जगण्यास तयार ती मूर्ती
प्राण तेव्हडे राहिले , ते तुझ्याकडेच आहे
जे काही आयुष्याने दिले .. ते सर्व काही .. जे मी आयुष्याला दिले .. ते सर्व काही माझ्या शब्दात .. माझ्या रचनेत
Friday, May 14, 2010
खूप खूप रे
तुझ्याशी बोलायचं आहे
एकदाच का होईना
सगळ व्यक्त करायचे आहे
सांगायचं मला
कशी तुझी
आठवण होते
डोळ्यातलं पाणी
पापण्यांनी अडवते
खूप खूप रे
तुझ्याशी बोलायचं आहे
तुजवीण नाही सुचत काही
खूप वेळा हेच सांगायचं आहे
सांगायचं मला
आता जखमा
तुलाच दाखवायच्या असतात
तुझ्याच कुशीत येऊन
पापण्या ओल व्हायचं म्हणतात
खूप खूप रे
तुझ्याशी बोलायचे आहे
क्षण भंगुर आयुष्य हे असे
संपण्याआधी तुझ्यात जगायचे आहे
विचारायचं मला
का तू सदैव माझ्यात असतोस
उद्या असेल नसेल कुणाला माहित
आजच मान्य करायचं आहे
प्रेम बनून हृदयात माझ्या तूच वसतोस
खूप खूप रे
तुझ्याशी बोलायचे आहे .
तुझ्याशी बोलायचं आहे
एकदाच का होईना
सगळ व्यक्त करायचे आहे
सांगायचं मला
कशी तुझी
आठवण होते
डोळ्यातलं पाणी
पापण्यांनी अडवते
खूप खूप रे
तुझ्याशी बोलायचं आहे
तुजवीण नाही सुचत काही
खूप वेळा हेच सांगायचं आहे
सांगायचं मला
आता जखमा
तुलाच दाखवायच्या असतात
तुझ्याच कुशीत येऊन
पापण्या ओल व्हायचं म्हणतात
खूप खूप रे
तुझ्याशी बोलायचे आहे
क्षण भंगुर आयुष्य हे असे
संपण्याआधी तुझ्यात जगायचे आहे
विचारायचं मला
का तू सदैव माझ्यात असतोस
उद्या असेल नसेल कुणाला माहित
आजच मान्य करायचं आहे
प्रेम बनून हृदयात माझ्या तूच वसतोस
खूप खूप रे
तुझ्याशी बोलायचे आहे .
Saturday, May 8, 2010
जेव्हा जेव्हा हसते
ती गालातल्या गालात अशी
अन मेहंदीने रंगलेल्या हाताने
घट्ट पकडते बोलताना उशी
काही संबंध नसताना
तेव्हाच तुला यायचं असत का
स्मरणात माझ्या असे
अन चिडवायचे असते मला
मी तिला चिडवन्या आधी
ती बघत असते तिचे सुंदर हात
मेहंदीचा रंग आणि हिरव्या चुड्याचा साज
मग देऊन हातात हात माझ्या म्हणते
तुझे हि असतील उद्या यासम ,माझे आज
नेमके तेव्हाच तेव्हाच एखादी कविता
मनात तुझी घोळत असते सारखी
ज्यात कोणाच्या तरी हाताची
कोणाच्या तरी साथी ची तुझी आस
सहज शब्दात तू असते रचलेली
आई आणि बाबान च्या बरोबरीने
काल ताला वर पाय तिचे नाचले
छुम छुम पैंजण तिचे गात राहिले
जल्लोष आनंदाचा , आत काही दुखत राहिले
नेमके मी धरावा ताल अन
नियती नाचवते शब्द तुझे आठवावे
हे परके रंग सध्या जगतात माझ्यात
कुठे अस्तित्व माझे ? कुठे शोधावे ?
ती गालातल्या गालात अशी
अन मेहंदीने रंगलेल्या हाताने
घट्ट पकडते बोलताना उशी
काही संबंध नसताना
तेव्हाच तुला यायचं असत का
स्मरणात माझ्या असे
अन चिडवायचे असते मला
मी तिला चिडवन्या आधी
ती बघत असते तिचे सुंदर हात
मेहंदीचा रंग आणि हिरव्या चुड्याचा साज
मग देऊन हातात हात माझ्या म्हणते
तुझे हि असतील उद्या यासम ,माझे आज
नेमके तेव्हाच तेव्हाच एखादी कविता
मनात तुझी घोळत असते सारखी
ज्यात कोणाच्या तरी हाताची
कोणाच्या तरी साथी ची तुझी आस
सहज शब्दात तू असते रचलेली
आई आणि बाबान च्या बरोबरीने
काल ताला वर पाय तिचे नाचले
छुम छुम पैंजण तिचे गात राहिले
जल्लोष आनंदाचा , आत काही दुखत राहिले
नेमके मी धरावा ताल अन
नियती नाचवते शब्द तुझे आठवावे
हे परके रंग सध्या जगतात माझ्यात
कुठे अस्तित्व माझे ? कुठे शोधावे ?
तुझ्यावर .. आणि माझ प्रेम
काय वेडा आहेस का?
हा आता कधी कधी
जेव्हा कुणीही नसत
आसपास .. म्हणाव तस
मग बोलावस वाटत तुझ्याशी सहज
अन कधी तू नसलास
बोलायला कुठे हि
मग आपोआपच आठवतात
तुझे शब्द न शब्द... सहज
पण पण म्हणून काय
तुझ्यावर ... आणि माझ प्रेम
काय वेडा आहेस का ?
हा आता कधी कधी
आजूबाजूला असते गर्दी
अन मनात एकांत एकटा
तूच त्याचा होऊन जातोस सहज सोबती
स्पर्श कुणाच्या नजरेचा होता
मन भिवून शोधते तुझ्या
तुझ्याच शब्दांची मऊ कुशी
निर्धास्त असते मी तुझ्या जवळ येउनी
पण पण म्हणून काय
तुझ्यावर ... आणि माझ प्रेम
काय वेडा आहेस का ?
हा कधी कधी श्वास गोठतो
परक परक जग होत
अन जेव्हा खूप रडावस वाटत
कुठलीही वेदना तुझ्पाशीच व्यक्त होते
मग रडून रडून जीव
कोरडा कोरडा होतो
तुझ्याच शब्दांचा ओलावा
पुन्हा जीवास संजीवनी होतो
पण पण म्हणून काय
तुझ्यावर ... आणि माझ प्रेम
काय वेडा आहेस का ?
काय वेडा आहेस का?
हा आता कधी कधी
जेव्हा कुणीही नसत
आसपास .. म्हणाव तस
मग बोलावस वाटत तुझ्याशी सहज
अन कधी तू नसलास
बोलायला कुठे हि
मग आपोआपच आठवतात
तुझे शब्द न शब्द... सहज
पण पण म्हणून काय
तुझ्यावर ... आणि माझ प्रेम
काय वेडा आहेस का ?
हा आता कधी कधी
आजूबाजूला असते गर्दी
अन मनात एकांत एकटा
तूच त्याचा होऊन जातोस सहज सोबती
स्पर्श कुणाच्या नजरेचा होता
मन भिवून शोधते तुझ्या
तुझ्याच शब्दांची मऊ कुशी
निर्धास्त असते मी तुझ्या जवळ येउनी
पण पण म्हणून काय
तुझ्यावर ... आणि माझ प्रेम
काय वेडा आहेस का ?
हा कधी कधी श्वास गोठतो
परक परक जग होत
अन जेव्हा खूप रडावस वाटत
कुठलीही वेदना तुझ्पाशीच व्यक्त होते
मग रडून रडून जीव
कोरडा कोरडा होतो
तुझ्याच शब्दांचा ओलावा
पुन्हा जीवास संजीवनी होतो
पण पण म्हणून काय
तुझ्यावर ... आणि माझ प्रेम
काय वेडा आहेस का ?
येऊन तू पाहू नको कधीही
कसे जाहले मी निशब्द आता
तुझे न येणेही हि काव्य होते
असेच होऊ दे मज व्यक्त आता
येऊन तू पाहू नको कधीही
कसे गालावरी रंग हसतात माझ्या
तुझी वाट पाहणे असेही खुलवते मला
अशीच वाट तुझी पाहू दे मला
येऊन तू पाहू नको कधीही
कुणी जपलेत शब्द तुझे भावना तुझ्या
पाहशील तू तर कोमेजतील लाजून
अशीच अव्यक्त राहू दे हि भावना
येऊन तू पाहू नको कधीही
तुझ्याच येण्याची का आस हि मना
असून तू दूर , जरी राहतोस स्पंदनात या
असेच दूर तू रहा, सागावे हे का कुणा ?
येऊन तू पाहू नको ...कधी कधीही
कसे जाहले मी निशब्द आता
तुझे न येणेही हि काव्य होते
असेच होऊ दे मज व्यक्त आता
येऊन तू पाहू नको कधीही
कसे गालावरी रंग हसतात माझ्या
तुझी वाट पाहणे असेही खुलवते मला
अशीच वाट तुझी पाहू दे मला
येऊन तू पाहू नको कधीही
कुणी जपलेत शब्द तुझे भावना तुझ्या
पाहशील तू तर कोमेजतील लाजून
अशीच अव्यक्त राहू दे हि भावना
येऊन तू पाहू नको कधीही
तुझ्याच येण्याची का आस हि मना
असून तू दूर , जरी राहतोस स्पंदनात या
असेच दूर तू रहा, सागावे हे का कुणा ?
येऊन तू पाहू नको ...कधी कधीही
होतो आता हा असा
भास तुझा किती मला रे
दिसतोस तू समोर कधी
अन अदृश्य पुन्हा कसा रे
होतो आता हा असा
सांज रंग सावळा सावळा
मन पटलावर माझ्या रंग तुझे
मावळतान सूर्य हि हसतो जसा रे
होतो असा हा आसमंत
गंधित गंधित तुज सुगंधाने
श्वासात दरवळतो भुलवतो
कशी आगळी हि आठवणीची नशा रे
होतो आता हा चंद्र हि खोडकर
नाही कधी हि बोलले कुणा
नाही कधी हि सांगितले मी
दिसती का नयनात माझ्या तुझ्या प्रीत खुणा रे
भास तुझा किती मला रे
दिसतोस तू समोर कधी
अन अदृश्य पुन्हा कसा रे
होतो आता हा असा
सांज रंग सावळा सावळा
मन पटलावर माझ्या रंग तुझे
मावळतान सूर्य हि हसतो जसा रे
होतो असा हा आसमंत
गंधित गंधित तुज सुगंधाने
श्वासात दरवळतो भुलवतो
कशी आगळी हि आठवणीची नशा रे
होतो आता हा चंद्र हि खोडकर
नाही कधी हि बोलले कुणा
नाही कधी हि सांगितले मी
दिसती का नयनात माझ्या तुझ्या प्रीत खुणा रे
दिलेस तू स्वप्न असे कि
पाहते असे जागे पणीही
होतेच ते क्षणिक जरी
जपले लाख लाख श्वासातुनी
दिलेस तू स्वप्न असे कि
सहज कधीही बसता उठता
जाते त्यात असे हरवूनी
नसे भान पाही कुणी बोले कुणी
दिलेस तू स्वप्न असे कि
सूर झंकारतात कानी मनी
नाही कुठे हि नाद ताल जरी
रुणझुणते संगीत क्षणो क्षणी
दिलेस तू स्वप्न असे कि
दिसते डोळ्यात ते माझ्या
अन हसते किती गालातुनी
पाहतो मलाच निसर्ग हा राहुनी राहुनी
दिलेस तू स्वप्न असे कि
होते लाजून रंग अंतरी
खुलते हे रूप अन रंग हि हा
विचारी सगळे "काय..?" मज पाहुनी
दिलेस तू स्वप्न असे कि ..... स्वप्न असे कि ... स्वप्न असे कि
पाहते असे जागे पणीही
होतेच ते क्षणिक जरी
जपले लाख लाख श्वासातुनी
दिलेस तू स्वप्न असे कि
सहज कधीही बसता उठता
जाते त्यात असे हरवूनी
नसे भान पाही कुणी बोले कुणी
दिलेस तू स्वप्न असे कि
सूर झंकारतात कानी मनी
नाही कुठे हि नाद ताल जरी
रुणझुणते संगीत क्षणो क्षणी
दिलेस तू स्वप्न असे कि
दिसते डोळ्यात ते माझ्या
अन हसते किती गालातुनी
पाहतो मलाच निसर्ग हा राहुनी राहुनी
दिलेस तू स्वप्न असे कि
होते लाजून रंग अंतरी
खुलते हे रूप अन रंग हि हा
विचारी सगळे "काय..?" मज पाहुनी
दिलेस तू स्वप्न असे कि ..... स्वप्न असे कि ... स्वप्न असे कि
Tuesday, May 4, 2010
क्षण हे तुझ्या माझ्या आयुष्यातले
अफाट उत्तुंग प्रीतीने व्यापले असे
तू हि हरवलास मी हि हरवले
मौनाने आपणा दोघानाही गाठले असे
क्षण हे तुझ्या माझ्या आयुष्यातले
मोहरून बघ आले फुलुनी आले
वेदना काव्यात उतरली भाव अबोल जाहले
विरह हि बोलतो दूर तू ,जवळच पण पहिले
क्षण हे तुझ्या माझ्या आयुष्यातले
जरी रुतती काट्या परी , प्रेमाने साहिले
किती तरी दोष मनाला दिले मनानेच
परी तुझ्या आठवणीतच कैद झाले
क्षण हे तुझ्या माझ्या आयुष्यातले
का नाही कळत मला , का नाही कळत तुला
राहणार आहे स्वप्नच हे कायम साखर झोपेतले
मी आनंदी मात्र स्वप्न तर तुझे मिळाले
क्षण हे तुझ्या माझ्या आयुष्यातले
किती खरे किती खोटे नाही रे माहित मला
तुझी अबोलता तुझी संवेदना अन जाणीव माझ्या मना
न बोलताच काही शब्द रंग जाहले त्यात रंगले
क्षण हे तुझ्या माझ्या आयुष्यातले
कधीच कधीच समजावता येणार नाही
क्षणा ना हि वाटेल जगायचे राहून गेले
तुझ्यात जगता जगता मरून कितीदा उरले ... जिंकून हि हरले ... हरुनही जिंकले ...!!!
Subscribe to:
Posts (Atom)