Friday, May 14, 2010

नको रे हा विरह आता
ये लवकरी जरा
विखुरले पुरती आता
येऊन सावर जरा

नको रे हा छळ आता
ये मन पाखरा
तुटले संयमाचे पंख आता
या जखमा पहा

नको रे हा खेळ जीवाचा
तू जवळी हवा
श्वास हा अखेरचा समजुनी माझा
श्वास घेउनी ये नवा

No comments:

Post a Comment