Friday, May 14, 2010

खूप खूप रे
तुझ्याशी बोलायचं आहे
एकदाच का होईना
सगळ व्यक्त करायचे आहे

सांगायचं मला
कशी तुझी
आठवण होते
डोळ्यातलं पाणी
पापण्यांनी अडवते

खूप खूप रे
तुझ्याशी बोलायचं आहे
तुजवीण नाही सुचत काही
खूप वेळा हेच सांगायचं आहे

सांगायचं मला
आता जखमा
तुलाच दाखवायच्या असतात
तुझ्याच कुशीत येऊन
पापण्या ओल व्हायचं म्हणतात

खूप खूप रे
तुझ्याशी बोलायचे आहे
क्षण भंगुर आयुष्य हे असे
संपण्याआधी तुझ्यात जगायचे आहे

विचारायचं मला
का तू सदैव माझ्यात असतोस
उद्या असेल नसेल कुणाला माहित
आजच मान्य करायचं आहे
प्रेम बनून हृदयात माझ्या तूच वसतोस

खूप खूप रे
तुझ्याशी बोलायचे आहे .

No comments:

Post a Comment