Saturday, May 8, 2010

जेव्हा जेव्हा हसते
ती गालातल्या गालात अशी
अन मेहंदीने रंगलेल्या हाताने
घट्ट पकडते बोलताना उशी

काही संबंध नसताना
तेव्हाच तुला यायचं असत का
स्मरणात माझ्या असे
अन चिडवायचे असते मला
मी तिला चिडवन्या आधी

ती बघत असते तिचे सुंदर हात
मेहंदीचा रंग आणि हिरव्या चुड्याचा साज
मग देऊन हातात हात माझ्या म्हणते
तुझे हि असतील उद्या यासम ,माझे आज

नेमके तेव्हाच तेव्हाच एखादी कविता
मनात तुझी घोळत असते सारखी
ज्यात कोणाच्या तरी हाताची
कोणाच्या तरी साथी ची तुझी आस
सहज शब्दात तू असते रचलेली

आई आणि बाबान च्या बरोबरीने
काल ताला वर पाय तिचे नाचले
छुम छुम पैंजण तिचे गात राहिले
जल्लोष आनंदाचा , आत काही दुखत राहिले

नेमके मी धरावा ताल अन
नियती नाचवते शब्द तुझे आठवावे
हे परके रंग सध्या जगतात माझ्यात
कुठे अस्तित्व माझे ? कुठे शोधावे ?

No comments:

Post a Comment