Saturday, May 8, 2010

दिलेस तू स्वप्न असे कि
पाहते असे जागे पणीही
होतेच ते क्षणिक जरी
जपले लाख लाख श्वासातुनी

दिलेस तू स्वप्न असे कि
सहज कधीही बसता उठता
जाते त्यात असे हरवूनी
नसे भान पाही कुणी बोले कुणी

दिलेस तू स्वप्न असे कि
सूर झंकारतात कानी मनी
नाही कुठे हि नाद ताल जरी
रुणझुणते संगीत क्षणो क्षणी

दिलेस तू स्वप्न असे कि
दिसते डोळ्यात ते माझ्या
अन हसते किती गालातुनी
पाहतो मलाच निसर्ग हा राहुनी राहुनी

दिलेस तू स्वप्न असे कि
होते लाजून रंग अंतरी
खुलते हे रूप अन रंग हि हा
विचारी सगळे "काय..?" मज पाहुनी

दिलेस तू स्वप्न असे कि ..... स्वप्न असे कि ... स्वप्न असे कि

No comments:

Post a Comment