Tuesday, May 4, 2010

क्षण हे तुझ्या माझ्या आयुष्यातले
अफाट उत्तुंग प्रीतीने व्यापले असे
तू हि हरवलास मी हि हरवले
मौनाने आपणा दोघानाही गाठले असे

क्षण हे तुझ्या माझ्या आयुष्यातले
मोहरून बघ आले फुलुनी आले
वेदना काव्यात उतरली भाव अबोल जाहले
विरह हि बोलतो दूर तू ,जवळच पण पहिले

क्षण हे तुझ्या माझ्या आयुष्यातले
जरी रुतती काट्या परी , प्रेमाने साहिले
किती तरी दोष मनाला दिले मनानेच
परी तुझ्या आठवणीतच कैद झाले

क्षण हे तुझ्या माझ्या आयुष्यातले
का नाही कळत मला , का नाही कळत तुला
राहणार आहे स्वप्नच हे कायम साखर झोपेतले
मी आनंदी मात्र स्वप्न तर तुझे मिळाले

क्षण हे तुझ्या माझ्या आयुष्यातले
किती खरे किती खोटे नाही रे माहित मला
तुझी अबोलता तुझी संवेदना अन जाणीव माझ्या मना
न बोलताच काही शब्द रंग जाहले त्यात रंगले

क्षण हे तुझ्या माझ्या आयुष्यातले
कधीच कधीच समजावता येणार नाही
क्षणा ना हि वाटेल जगायचे राहून गेले
तुझ्यात जगता जगता मरून कितीदा उरले ... जिंकून हि हरले ... हरुनही जिंकले ...!!!

No comments:

Post a Comment