Friday, May 14, 2010

उरलेले मी शोधते आहे
जगण्याचे बंध पुन्हा बांधले
मनाचे सांगाडे जोडते आहे

दिसतात काही चिन्ह त्यावर
जखमांची तरी हि रेशीम स्पर्श
बहुतेक तेच माझ हृदय आहे

काळेभोर तसेच ओलावा तसाच
तेच असतील दोन नयन माझे
पुसट त्यातले चित्र वहायचे बाकी आहे

केलीत गोळा सांध्लेत सांधेही
पुन्हा जगण्यास तयार ती मूर्ती
प्राण तेव्हडे राहिले , ते तुझ्याकडेच आहे

No comments:

Post a Comment