Friday, June 4, 2010

का कुणाला सांगावे ?
का स्पष्ट करावे ?
नाही का कळणार?
न सांगताही
नाही जमणार का करायला ?
मौनाची भाषांतरे

का बोलावे ओठांनी
का हसावे शब्दांनी
हा निसर्ग कधी बोलतो का
तरीही कसा व्यक्त होतो
मलाही असेच राहायचे आहे
शांत आस्मान्तासारखे

न कुठला मोह न कुठली इच्छा
बस एक हा आणि एक तो श्वास
त्या श्वासा दरम्यानच नात
हा छंद एकांताचा , आणि प्रांत उदास
मनमुक्त आता स्पंदनातून
पुन्हा नुसते मुक्त वाहत राहायचे

सोडून सगळी बंधने
सगळी मनावरची कुंपणे
तोडून क्षणात सगळे साखळदंड
मी चालतेय एका वाटेवर पहाटेच्या
फक्त साथ माझी मला पुरेशी
आज गाणे एकटीनेच आहे गायचे ...!

1 comment: