मनस्वी मनस्वी
तू तेजस्वी तेजस्वी
हे दिव्य अगाध
हि प्रतिमा तुझी साधी
शोध आपल्यातीलच
मातीचा , मातीच्या गंधाचा
आपल्यातीलच वेडाचे
वेड होते कसले आधी ?
मनस्वी मनस्वी ........
हि प्रीत शब्दांची
कि शब्दात प्रीत त्याची
हि तूच मौन प्रिया कि
कि प्रीत तुझ्यातली बोलकी
मनस्वी मनस्वी .....
ओला ओला दरवळ
आता तुझ्या डोळ्यात नाही
स्थिर क्षम नयन पण
काहुरले मन अस्वथ किती
मनस्वी मनस्वी ....
अशीच भिजून हि
तू कोरडी कोरडी
भिज्र्या घराची
जशी उबदार ओसरी
मनस्वी मनस्वी ,,,,,
तू उब भिजल्या मनाला
तू कोपरा आसरा
नको होऊस पावसात ओली
तुषारात राहा फक्त गारठलेली
मनस्वी मनस्वी ..
No comments:
Post a Comment