Friday, June 4, 2010

एक पावसाळी सांज ... लघु कथा

एका निष्पर्ण झाडावर बसलेल्या एका पक्ष्याकडे ती एकटक बघत होती
संध्याकाळ झालेली सूर्य उतरणीच्या दिशेला तरीही त्या पक्ष्याला घराची ओढ का लागत नव्हती ती अशीच मनोमन विचार करीत राहिली
ती अशीच होती कधी कधी असेच एकटक बघत तीच शून्यातल विश्व तिच्याशी बोलू लागायचं ती हि बोलायची मग त्या विश्वाशी हळुवार
अजून हि तो पक्षी तिथेच बसलेला , पक्ष्यांचे थवे उडत होते परतीच्या दिशेने पण हा पक्षी मात्र तिथे च बसलेला , तिला आता त्याच आश्चर्य वाटू लागल , तिची नजर एकटक खिडकीतून दिसणाऱ्या त्या झाडाकडे त्या झाडावर बसलेल्या पक्ष्याकडे , झाड हि त्याने निष्पर्ण निवडले होते बसायला , तिला उगीचच दाटून येऊन लागल , वाटल कि किती बर झाल असत जर या पक्ष्याशी मी बोलू शकले असते ,
आईने हाक मारली तशी ती नाईलाजाने उठली आणि माजघरात गेली , " चहा घेणार का ग " आईने विचारल ती हो म्हणून आईच्या हातातला चहाचा कप घेतला घाईने निघणार तेव्हड्यात आई म्हणाली " माऊ, ती खिडकी जरा लाव ,आणि गच्चीवरून तेव्हडे कपडे काढून आन तर " ती खिडकीजवळ गेली एकदा पाहिलं तो पक्षी तिथेच होता , तिने खिडकी बंद केली आणि वेगाने गच्चीवर गेली , आई ने सांगितलेल्या कामाचे भान च नाही राहिले तिला , गच्ची च्या भिंतीवर हात टेकून हातात चहाचा कप घेऊन ती त्या पक्ष्याचे निरीक्षण करू लागली , अजून हि तो फक्त एकटक इकडे तिकडे बघत होता फक्त . हवेत गारवा जाणवत होता , बहुतेक पाऊस पडणार अस वाटत
होत.
तेव्हड्यात तिचा सेल फोन घेऊन एक मुलगा धावत आला " माऊ तुझा फोन , माऊ तुझा फोन " धापा टाकत एकमेकांच्या मागे पळत अजून काही मुले आली , मी फोन घेतला , तोपर्यंत कट झाला होता . तिने पहिले त्याचा च होता , तिने फोन लावला , एव्हाना हवा जोरात वाहायला लागली होती . अचानक लक्षात आले कपडे न्यायचे आहेत खाली तिने पटकन मुलांना बोलावले त्यांना कपडे गोळा करून दिले आणि एवढे ठेवून या मग आपण खेळू असे म्हणून मुलांना खाली पाठवले , रिंग वाजत होती ,... तिकडन आवाज आला " हेल्लो , कुठे आहेस ?" तिने एक निश्वास टाकला आणि म्हणाली " गच्चीवर " तिने बोलता बोलता नजर त्या पक्ष्याकडे वळवली तो अजून हि तिथेच होता , त्याच बोलन सुरु झाल पण फोन कट झाला , नंतर तिने प्रयत्न केला लावायचं पण काही लागेना , मग तिने फोन बाजूला ठेवला आता तिच्या डोक्यात तो पक्षी , तो आणि ती स्वतः ,,,, तो हि असाच वाटायचा तिला या पक्ष्यासारखा जवळचा , पण का ? तो तर मुळीच असा नव्हता , नेहमी घोळक्यात असायचा , नेहमी त्याच हसन , भांडण , जीवाला जीव देणाऱ्या मित्रान बरोबर गप्पा आणि मज्जा ,,, तरीही मग कुणास ठाऊक तिला तो पक्ष्यासारखा का वाटू लागला होता , तो पक्षी गारठला होता गारव्याने ,,,, तरीही तो तिथेच होता बसलेला ,,,, का ,,,,, कुणास ठावूक ,,,,,,,,, आणि हि हि गारठली होती आता ,,,, त्याच भेटन तिला खूप जवळच वाटायचं त्याच बोलन जणू तिच्यासाठीच असल्यासारखं वाटायचं ,,, त्याच्या हसण्यातही का कुणास ठावूक त्याचा गहिवर ऐकू यायचा ,कधी बोलताना अचानक त्याचा आवाज हळुवार व्हायचा फार कमी वेळा पण ते क्षण ते बोलन तिने साठवून ठेवलं होत ,,, ज्या बोलण्याला फक्त तिच्या हृदयाची साक्ष होती ..... अंधार दाटू लागला आज जरा लवकर च दाटला होता ,,, ती त्या गारठलेल्या पक्ष्याकडे पाहत होती , किती तंद्रीत होता तो ,,,,, त्याच्यासारखाच ...... कधीच कोणाबद्दल बोलला नाही ,,, म्हणायचं फक्त मी आहे माझ्याशी बोल .... जसा त्या पक्ष्याने ठाव घेतला होता तिच्या मनाचा तसाच त्याने हि घेतला होता ... आता पावसाचे टपोरे थेंब पडायला सुरुवात झाली तो पक्षी जागी फड फड करू लागला आता त्याला उब हवी होती तो उडाला खूप दूर एका भरगच्च मोठय झाडाच्या पानांआड लपून बसला अदृश्य दिसत होता , तेव्हड्यात तीच फोन वाजला ... " हेल्लो काय करतेस , तुझ्या मिठीत यायचं आहे ,फार थंडी वाजतेय , ये ना ग !" ती फक्त गालात हसली काहीही ना बोलता ,,, पावसाचे थेंबात भिजत राहिली " हेल्लो बोल ना हेल्लो " फक्त आवाज ऐकत राहिली

No comments:

Post a Comment