Friday, June 4, 2010

कुठे काही कळते तिला
तीच मन हि ऐकत नाही
जिथे त्याचा श्वास गुदमरतो
ती हि तेथे थांबत नाही

कसलीही तक्रार त्याला कुठे
मोह फक्त मोकळ्या श्वासाचा
कुणाचा द्वेष नाही त्याला
नकोय रंग कृत्रिमतेचा

सोडावेत मोकळे शब्द वार्यावर
भिर भीरु द्यावेत फुल पाखरापारी
ते कुठे ऐकतात कुणी पहिले त्यांना
म्हटले त्यांना सुंदर जरी

नाही कुठलेही कारण ना स्पष्टीकरण
बस्स श्वास हवा होता शब्दांना
मग लिहून हि कविता कागदावर
दिले उधळून वार्यावर त्यांना

तुम्ही हि मुक्त व्हा कागदातुनी
नाही तुमच्यावर माझी मालकी
बस कधीतरी करता आली तर करा
व्यथा माझी सहज बोलकी

1 comment: