Saturday, February 20, 2010

"बाई अजून माणुसकी शिल्लक आहे या जगात

आपल्यासारखाच प्रत्येकाचे आयुष्य असत का ? प्रत्येकाच्या भावना वेगळ्या ,आवडी वेगळ्या ,दुखे वेगळी , इच्छा वेगळ्या त्यांना सामोरे जाण्याची प्रेरणा हि वेगळी ,

पण सर्वांमध्ये असणारा एक समान धागा मला ओढ लावतो आय्ष्याला जाणून घेण्याची,एका मैत्रिणीच्या बाबतीत घडलेला एक प्रसंग ,रिक्षातून प्रवास करत असताना एका थांब्यावर एका बाईने रिक्षा थांबवला , पोशाख आणि अवतारावरून परिस्तिथी जेमेतेम असल्याचे समजते, रिक्षात बसल्यानंतर संपूर्ण प्रवास शांत , तीच ठिकाण आले ती उतरली आणि चालू लागली , रिक्षावाला आवाज देऊन म्हणाला " बाई पैसे ?" ती बाई गंभीर आवाजात म्हणाली " पैसे नाहीत ", माझ्या मैत्रिणीला वाटले कि आता काहीतरी वाद होणार पण ती काही बोलण्याचा आतच रिक्षावाला म्हणाला " ठीक आहे , असू द्या " आणि चालू लागला त्या बाईने पुन्हा आवाज दिला " दादा थांब ", तिने तिच्या कडे असलेला एकमेव वस्तू कदाचित .....पायातली एक जोडावी काढून दिली . रिक्षावाला म्हणाला " बाई माणुसकी अजून शिल्लक आहे जगात , असू दे ." असे म्हणून त्याने रिक्षा सुरु केला , मैत्रीण म्हणाली " एवढ्या उन्हात तुम्ही एका सीट साठी किती वेळ वाट पाहत होता आणि आश्चर्य तुम्ही किती सहज तुमची कमाईसोडून दिलीत " रिक्षावाला म्हणाला " अहो ताई, मला उन्हात बसलेल्या चटक्या पेक्षा त्या बाईचे होरपळणे जास्त जाणवलं मला " थांबा आला आणि माझी मैत्रीण उतरली तिच्याबरोबर तिने त्या बाईचे हि पैसे देऊ केले पण त्या रिक्षावाल्याने घेतले नाही ,

तिने मला भेटल्याबरोबर हे सगळ सांगितलं आणि म्हणाली " कि आपण किती व्यस्त झालो आहोत कि आपल्या आजूबाजूच्या संवेदनाही कळत नाहीत, कदाचित मी त्या बाईंशी बोलायला हवे होते ." तिला काय वाटत होते हे मी समजू शकत होते ,

माझ्या मनात त्या रिक्ष्यावाल्याचे शब्द खूप वेळ घोळत राहिले " बाई अजून माणुसकी शिल्लक आहे जगात ." मी म्हणाले मनातल्या मनात " हो आहे , तुमच्यासारख्या जाणत्या मनामुळे जे फक्त जीवनाच्या शाळेतच घडत ". दुसर्यादिवशी माझ्या मैत्रिणीनी सांगितलेल्या त्याच रिक्ष्यावाल्याच्या प्रसंगावरून आम्ही खूप वेळ हसत होतो .
ती म्हणाली रस्त्याने एक व्यापारी त्या रिक्षावाल्याला बोलत होता " काय तुम्ही रिक्षावाले बाहेरच्या माणसाना फसवतात पाच रुपयांवर एक पैसा नाही देणार " तो रिक्षावाला म्हणत होता " हे बघा साहेब, पाच रुपयात मी इथपर्यंत च येऊ शकतो , उतरा इथेच , ...... उतरवा तुमचे सामान "

No comments:

Post a Comment